डॉ. आर. एन. इंगवले पाटील पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली – आ. शहाजीबापू पाटील

सांगोला (बारामती झटका)

अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या डॉ. आर. एन. इंगवले पाटील पतसंस्थेने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले. ते दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या डॉ. आर. एन. इंगवले पाटील पतसंस्थेच्या वर्धापनदिन सोहळा व रक्तदान शिबिराप्रसंगी बोलत होते.

सांगोला शहरातील डॉ. आर. एन. इंगवले पाटील को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सांगोला या पतसंस्थेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, उद्योगपती भाऊसाहेब रुपनवर, पंचायत समितीचे उपसभापती नारायण जगताप, बाळासाहेब एरंडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरीभाऊ पाटील, सोमेश यावलकर, दत्तात्रय टापरे, डॉ. पियूष साळुंखे-पाटील, रवी कांबळे, सुनील भोरे, अभिजित नलवडे, अच्युत फुले, सूर्योदय परिवाराचे संस्थापक अनिल इंगवले, जगन्नाथ भगत, गजानन भाकरे, महेश नलवडे, विजयकुमार सुर्यवंशी, दिलीप जाधव, डॉ. प्रशांत तेली, सुरेश पाटील, शहाजी गडहिरे, ललित बाबर, बी.आर. बंडगर, संतोष इंगवले, अतुल कसबे, प्रशांत पाटील, तानाजी इंगवले, बाळासो लेंडवे, सतीश इंगवले, सुनील गव्हाणे, निखील नकाते, सुनील गव्हाणे, श्रीकांत कोळी, मनोज केदार, नितीन सावंत, फिरोज मणेरी, कुमार ऐवळे, रुपेश इंगोले आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉ. आर. एन. इंगवले, संस्थेचे अध्यक्ष अजयसिंह इंगवले, विजयकुमार इंगवले, उदय इंगवले यांच्यासह राजलक्ष्मी ऑरगॅनिक परिवारातील विजयकुमार सुर्यवंशी, नागेशजाधव यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.
डॉ. आर. एन. इंगवले पाटील पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी पतसंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनिमगांव (म.) येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
Next articleमेडद गावचे जगताप आणि मांडवे गावचे मोरे यांचा मराठमोळा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here