माळशिरस ( बारामती झटका)
तिरवंडी ता. माळशिरस, या गावचे सुपुत्र कृषी अधिकारी श्री. शामराव पंढरीनाथ वाघमोडे यांची कन्या डॉ. ऋतुजा हिने B.A.M.S. पुणे येथून वैद्यकीय पदवी पूर्ण करून, M.D. प्रवेश परीक्षेत N.T.C या प्रवर्गातून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून उस्मानाबाद वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात M.S. स्त्री रोग तज्ञ या विषयातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फक्त 118 विद्यार्थ्यांना मर्यादित प्रवेश मिळतो. यामध्ये डॉ. ऋतुजा शामराव वाघमोडे यांनी प्रवेश मिळवला आहे. या मर्यादित जागेत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशा सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे प्रवेशापासून पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरमहा stipend (विद्यावेतन) दिले जातो. डॉ. ऋतुजा यांनी M.D. प्रवेश परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे त्यांना हे मानधन यापुढे प्राप्त होणार आहे.
त्यांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशामुळे संपूर्ण माळशिरस तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होऊन पुढील कार्यास शुभेच्छा मिळत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng