जीवात जीवमान असे तो जनसेवा करू ही स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी शिकवण दिली – पैलवान नारायण माने
फोंडशिरस (बारामती झटका)
जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान नारायण आबा माने मित्र मंडळ कण्हेर यांच्यातर्फे अनया संवर्धन फाउंडेशनच्या अनाथ आश्रमाला भेट देण्यात आली. यावेळी अनाथ मुलांना बनियन, अंडर वेअर, टॉवेल तसेच जिलेबी व लाडूचे वाटप करण्यात आले.

यावेळी पैलवान नारायण माने यांनी बोलताना सांगितले की, जीवात जीवमान असे तो जनसेवा करू ही शिकवण आदरणीय आमचे दैवत स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांनी शिकवण आम्हाला दिली. आज आदरणीय दादा साहेबांचा वाढदिवस सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यावेळी पैलवान मनोज पालवे, पैलवान रामभाऊ गोपने, पैलवान शिवाजी काळे, पैलवान सुभाष माने तसेच अनाथालयाचे व्यवस्थापक मुबारक मुगदुम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng