डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व – आयु. मनिषा जगताप – मखरे यांचे प्रतिपादन

भिमाई आश्रमशाळेत बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

बाबासाहेबांना प्रत्येक क्षेत्राची परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, जल, कृषी, पत्रकारिता व कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. आंबेडकरांनी दीन, दलित, श्रमिक, विस्थापितांच्या व शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. डॉ. आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. अशा शब्दात इंदापूर येथील भिमाई प्राथमिक आश्रमशाळेच्या शिक्षिका आयु. मनिषा जगताप – मखरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोलत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांनी तथागत बुद्धांच्या मूर्तीस पुष्प व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सामूहिक पंचशील व त्रिशरण घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. प्रा. जावेद शेख, भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांची भाषणं झाली. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर रत्नाकर मखरे, संचालक गोरख तिकोटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे शहराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
Next articleमाळेगाव येथील ‘राजहंस संकुल’ च्या इमारतींचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here