डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अरविंद लोंढे यांची निवड

श्रीपूर (बारामती झटका)

श्रीपूर ता. माळशिरस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूरचे अध्यक्षपदी अरविंद लोंढे तर सरचिटणीस पदी सतिश लांडगे, कार्याध्यक्ष पदी महादेव आठवले यांची निवड करण्यात आली आहे. मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूरचे हे ७१ वे वर्ष असून यावर्षीचे नूतन पदाधिकारी उपाध्यक्ष अनिल आठवले, संजय एकनाथ भोसले, तेजस बाबर, गणेश सावंत, जयंत कांबळे, जयंत भोसले, तर नियोजन समिती प्रमुख बापूसाहेब पोळके, अनिल नाईकनवरे, रमेश भोसले, अनिल दळवी, महेश रणपिसे, गौतम आठवले, बबन उबाळे, राजू शेंडगे, कार्यवाहक ज्ञानेश्वर काटे, नितीन आठवले, गौतम लोंढे, राजू नवगिरे, राजकुमार गायकवाड, तानाजी आठवले, संजय वाघमारे, महादेव सावंत, प्रमुख मार्गदर्शक तुकाराम बाबर, बी. टी. शिवशरण, भरत बनसोडे, सुखदेव साठे, दावल शिवशरण, भालचंद्र शिंदे पाटील, श्रीपाद देऊसकर, खजिनदार बाळासाहेब काटे हे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर येथील या मंडळाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. दि. १४ एप्रिल ते दि. २५ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अरविंद लोंढे यांनी दिली आहे. या कालावधीत व्याख्यान, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भिमगायन पार्टी यांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी समाजातील गुणवंत, हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर यांचे वतीने आतापर्यंत दरवर्षी जयंतीनिमित्त अनेक सामाजिक, विधायक, वैचारिक, सांस्कृतिक तसेच सर्व रोग निदान शिबिर नामवंत वक्ते सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गावांपुढे तसेच पंचक्रोशीतील लोकांपर्यंत आदर्श उपक्रम पोहचवले आहेत. तसेच सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सरचिटणीस सतिश लांडगे यांनी दिली आहे. रक्तदान शिबिर घेतले होते. यावेळी मंडळाचे ७१ वे वर्ष असल्याने या मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष सरचिटणीस कार्याध्यक्ष नियोजन प्रमुख यांचा सत्कार विशेष अतिथी यांचे हस्ते घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक तुकाराम बाबर यांनी दिली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्री बिरोबा यात्रेनिमित्त डे हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…
Next articleलाखेवाडी येथील भवानी मातेच्या पावनभूमीमध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here