डॉ. बा. ज. दाते प्रशाला नातेपुते येथे सन 1981-82 या दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा संपन्न

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथील डॉ. बा. ज. दाते प्रशाला येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा 1981/82 च्या बॅचचा स्नेह मेळावा 40 वर्षाने घेण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या युगात हा मेळावा करणे खुप जिकिरीचे होते परंतु, मिडीयाच्या माध्यमातून ते शक्य झाले. सुरुवातीला फेसबुकवर डॉ. बाळासाहेब ननवरे यांनी वर्ग मित्र गुलाब पवार यास संपर्क केला. नंतर एक एक मित्रांशी संपर्क होत गेला. अश्या या माध्यमातून हा ग्रुप तयार केला गेला. यामध्ये राजीव देशपांडे, अजित उराडे, सौ. रेखा ठोंबरे व इतर अनेक जणांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या स्नेहमेळाव्याची सुरुवात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला स्वपरिचय देऊन करण्यात आली. आपल्या जीवनरुपी शरीराला देव स्वरूप देणाऱ्या शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम देखील यावेळी घेण्यात आला. यावेळी प्रथमतः दीप प्रज्वलन करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने शिवाजीराव पिसाळ यांनी शिक्षकांबद्दल व विद्यार्थ्यांबद्दल व हा ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश याबद्दल प्रास्ताविकात सांगितले. तसेच एन. के. साळवे यांनी 1981-82 विद्यार्थ्यांचा ग्रुप स्थापनेमागे ज्यांचे श्रेय होते त्यांची माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

यावेळी शाळेतील त्याकाळात शिकवणारे शिक्षक एम.पी. कुलकर्णी, पुरुषोत्तम भरते, चंदनमल शहा, संजय बंदीस्टे सर, बर्वे मॅडम तसेच प्रभाकर पद्मन, घनश्याम ढोबळे, महावीर वसवडेकर, सर्जेराव वाघ असा कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता. तसेच शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक प्रवीण बडवे सर, पर्यवेक्षक पिसे सर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एम. पी. कुलकर्णी सर म्हणाले की, विद्यार्थी म्हणजे हे एक दैवत असते. त्याला घडवून त्याला देवत्व प्राप्त करायचे असते अशी मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. आज तुम्हा सर्वांना बघून मला अत्यंत आनंद झाला आहे. कारण मी घडवलेले विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने घडलेले आहेत.

यावेळी बोलताना चंदनमल शहा म्हणाले की, मी ज्या ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा दिली त्या त्या ठिकाणी मला चांगलेच विद्यार्थी मिळाले हे माझं भाग्य आहे आणि आज जो या विद्यार्थ्यांनी आमचा सत्कार घेतला हे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने श्रीकांत बाविस्कर म्हणाले की, हा ग्रुप कोरोनाच्या काळात टिकून ठेवायचे काम राजू जठार, बापू भांड, शिशिर पलंगे, महावीर लांडगे, प्रदीप बरडकर, जनार्दन बरडकर, सुरेश दळवी यांनी प्रत्येकाचे ज्या तारखेचे वाढदिवस आहे त्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे वाढदिवस साजरे करून हा ग्रुप टिकवण्याचे फार मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे हे संमेलन पार पाडू शकले.

जगणे आता उत्सव व्हावे,
क्षण क्षण हे भरभरून जगावे,
पैसाअडका याहीं पेक्षा,
फक्त आनंद हेच ध्येय असावे,
तो रुसला का ? ती फुगली का ?
तिथल्या तिथेच सोडून द्यावे,
सॉरीची ती कुबडी घेऊन,
नात्याला त्या उचलून घ्यावे,
कुणी वागला कसे जरीही,
देवाला न्यायाधीश करावे,
सोडुन दयावे दुखरे क्षण अन,
जगणे हे आनंदी करावे.
या कवितेप्रमाणे आज प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यात सामील झाले होते. मनुष्य हा आजीवन विद्यार्थीच असतो. तो सदासर्वकाळ शिक्षण घेतच असतो. समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणारे हे माजी विद्यार्थी वाटलेच नाहीत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हा सोनेरी दिवस आठवून त्यांनी जो उत्साह दाखविला… ‘माझा हा बेंच..’ तू इथे बसायचा…’ या संभाषणाचा साक्षीदार असल्याने हे तर आपले वर्तमानातील विद्यार्थी अशीच भावना निर्माण झाली.

शाळेविषयी जपलेला ऋणानुबंध, वर्गमित्र भेटल्याचा आनंद आणि आपली शाळा डोळ्यांमध्ये साठवून घेण्याची उत्सुकता या माजी विद्यार्थ्यांमध्ये पाहून शिक्षक हा किती श्रीमंत असतो याची जाणीव झाली. या प्रज्ञावंत, गुणवंत माजी विद्यार्थी विद्यार्थिनीशी बोलताना शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतून संस्काराची शिदोरी घेऊन जीवनात जी यशस्वी वाटचाल केली हीच आम्हा शिक्षकांची खरी कमाई आहे याची जाणीव झाली, अशी उपस्थित शिक्षकांनी आपली मतं व्यक्त केली. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पंखांना गगनभरारी घेण्यासाठी ज्या शाळेने बळ दिले, त्या शाळेला विद्यार्थ्यांच्यावतीने डाईज भेट देण्यात आले.

यावेळी शिशिर पलंगे, दशरथ पवार, महावीर लांडगे, अजित इनामदार, जितेंद्र दोशी, डॉ. बाळासाहेब ननवरे, ज्ञानदेव ननवरे, राजीव देशपांडे, रविंद्र चांगण सर, संजय गांधी, एन.के. साळवे, श्रीकांत बाविस्कर, युवराज मोहिते, रवींद्र डूडू, नारायणराव बोराटे, राजाभाऊ जठार, सुहासराव भांड, ॲड. शिवाजीराव पिसाळ, महादेव कासार, मनोज ढाके, जनार्दन बरडकर, प्रदीप बरडकर,शिवाजीराव भोसले, मिलिंद मिसाळ, गुलाबराव पवार, खाजुद्दीन शेख, अशोकराव भिसे, सुरेशराव दळवी, अभिनंदन ठोंबरे, प्रकाश ठोंबरे, केशव ठोंबरे, प्रमोद कुलकर्णी, भारत बावकर, संभाजीराव पांढरे, रघुनाथ टेंबरे, सोपान जाधव, सुनील कर्णे, सुभाष घरात, शंकर डफळ, संजय पोटे व विद्यार्थिनींमध्ये सौ. रेखा उराडे ठोंबरे, छाया बरडकर शिंदे, विभावरी दावडा दोशी, चेलना चंकेश्वरा दोशी, संगीता खंदारे इंगळे, कल्पना उराडे सावळकर, अलका गोरे बनकर, सरोजनी ढवळे खटावकर, वंदना इटकर तवटे, भारती आदलिंगे बोराटे, मीरा बडवे देशपांडे, संध्या शहा होरा, सुनिता सुतार, सुरेखा काळे माने, नफिसा तांबोळी आतार, ज्योती साळी काजवे, रुकसाना दारुवाले नदाफ, ताहिरा तांबोळी आदी उपस्थित होत्या. तसेच विविध शासकीय सेवेत रुजू असलेले विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकासह दोघांना दोन दिवसाची पोलिस कस्टडी तर, एक साथीदार फरार.
Next articleमाळशिरस तालुक्यात आरटीओ कार्यालय आहे, हे सांगायला लाज वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here