डोंबाळवाडी ( बारामती झटका)
डोंबाळवाडी नजिक रुपनवर वस्ती येथे गेले काही महिने प्रत्येक अमावस्येला बाळूमामा मासिक भंडारा उत्सव आयोजित केला जातो. सुरुवातीला छोट्या स्वरूपात होणारा भंडारा आत्ता सर्वांच्या सहकार्याने खूप व्यापक झाला आहे. डोंबाळवाडी व पंचक्रोशीतून हजारो भाविकभक्त बाळूमामांच्या आरतीला हजर राहत आहेत. ज्या ठिकाणी उत्सव भरतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मंदिर नाही तरीही तालुक्यातील सर्वात मोठा भंडारा येथे भरतो, याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सर्व भाविक कोणत्याही निमंत्रणाशिवाय आवर्जून उपस्थित राहतात. येणाऱ्या प्रत्येकाला मामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्यावर एक सकारात्मक ऊर्जा भेटत असते. एक प्रकारची मनःशांती भेटते.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाळूमामा तरुण मंडळ, रुपनवर वस्ती हे तरुण कार्यकर्ते करत असतात. वस्तीवरील सर्व लोक एवढा एक दिवस मोठ्या भक्तीभावाने हाताला पडेल ते काम ह्या भांडऱ्याच्या प्रसंगी करत असतात. बुधवारी होणाऱ्या भंडार्याचे आर्थिक सहाय्य प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय शेळके साहेब यांच्यातर्फे आहे.
सायं. ५ वा. गजी ढोल कार्यक्रम, सायं.७ वा. ह.भ.प. सागर महाराज बोराटे सर यांचे कीर्तन आहे. सायं.९ वा. महाआरती त्यानंतर महाप्रसाद आहे. प्रत्येकवेळीपेक्षा यावेळे भव्य मंडप, लायटिंग व आकर्षक सजावट अशी जोरदार तयारी केली गेली आहे.

या कार्यक्रमासाठी श्री. बाजीराव चोपडे सर सर्व व्यवस्थापन पहात असतात. तसेच गणेश रुपनवर, राजेंद्र रुपनवर, राहुल रुपनवर, अजिनाथ रुपनवर, रोहित रुपनवर, कुलदीप रुपनवर, कुणाल रुपनवर, दत्तात्रय महारनवर, केशव चोपडे, सुरज देवकाते, सुनील माने यांचे सहकार्य लाख मोलाचे असते. सदर कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng