डोंबाळवाडी येथील मनीषा वाघमोडे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपचे तालुका उपाध्यक्ष महादेव केसकर यांच्यावतीने सत्कार

डोंबाळवाडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडी (कु.) येथील रुपनवर वस्ती नं. १ च्या अंगणवाडी मदतनीस सौ. मनीषा आण्णा वाघमोडे यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष महादेव दादासो केसकर व डोंबाळवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. सुमित्रा महादेव केसकर या उभयतांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कारावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल माने, युवा नेते रवी महानवर, ह.भ.प. नाना बुवा धायगुडे, संतोष रुपनवर सर, मुलाणी सर, सेविका वायसे मॅडम, राम पाटील, वयोवृद्ध समाजसेवक अण्णा पाटील, अण्णा वाघमोडे, अनिल महाराज आदी उपस्थित होते.

नंदीवाल्या समाजातील एका महिलेला जिल्ह्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने व डोंबाळवाडी ग्रामस्थांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष महादेव केसकर यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआ. बबनदादा शिंदे यांचेकडून सीना नदीवरील खैराव-कुंभेज येथील पुलाची पाहणी
Next articleजनावरांच्या लम्पी आजाराबाबत शिंदे-फडणवीस सरकार बेजबाबदार, युद्धपातळीवर लसीकरण करावे – रविकांत वरपे, प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here