डोंबाळवाडी सोसायटीत माजी सरपंच आप्पासाहेब रुपनवर यांच्यासह सर्व उमेदवार दैदीप्यमान मतांनी विजयी.

डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत श्रीनाथ पॅनलने श्रीनाथ शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवला

डोंबाळवाडी ( बारामती झटका )

डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीनाथ पॅनलचे माजी सरपंच आप्पासाहेब रुपनवर यांच्यासह सर्वच्या सर्व तेरा सदस्यांनी दैदीप्यमान विजय मिळवला आहे. श्रीनाथ पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विरोधी असणारे श्रीनाथ शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवून दिलेला आहे. पॅनलचा सुपडा साफ करून पराभव केलेला आहे.


डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. दि. 19/09/1946 साली संस्थेची स्थापना झालेली आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल कोटीच्या आसपास असते. बँकेचे शंभर टक्के कर्ज वसूल असते. त्यापैकी 523 मतदानाला पात्र सभासद होते. संस्थेचे 728 सभासद आहेत. त्यापैकी 505 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांनी कामकाज पाहिले. त्यांना सहकार्य संस्थेचे सचिव ज्ञानदेव हाके यांनी केले.
डोंबाळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक श्रीनाथ पॅनल व श्रीनाथ शेतकरी पॅनल यांची समोरासमोर निवडणूक होत असताना एका उमेदवाराने अपक्ष नशीब आजमावले होते. दोन अंकी सुद्धा आकडा पार करता आला नाही.


श्रीनाथ पॅनल श्रीनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पाटील, किशोर वायसे, छगन रुपनवर, हनुमंत तुकाराम रुपनवर, सखाराम पाटील, बाळासाहेब रूपनवर, मोतीराम जैन, आप्पा सोपान रूपनवर, प्रमोद रूपनवर, आनंदा चव्हाण, रामभाऊ धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 सदस्यांनी निवडणूक लढवली होती.


सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात धायगुडे भिमराव कृष्णा 280, गावडे युवराज महादेव 240, रुपनवर बाबा रामचंद्र 263, रूपनवर दत्तू भानुदास 276, रुपनवर मारुतराव नाथा 258, रुपनवर नाथा शामराव 259, रुपनवर तानाजी रामहरी 253, वायसे नाथा बाळू 242, तर महिला प्रतिनिधी गटात रुपनवर सुनिता धनंजय 255, शिपकुले प्रतिभा विठ्ठल 247, अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ गटात अहिवळे नारायण रामचंद्र 251, भटक्या जमाती/विमुक्त जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदार गटात रुपनवर छगन साहेबराव 258 अशी तेरा उमेदवारांना मते पडलेली आहे.
श्रीनाथ शेतकरी पॅनल माजी सरपंच बापूराव रुपनवर, माजी सरपंच महादेव केसकर, सचिन आत्माराम रुपनवर, अमोल माने, सुनील वायसे, ज्ञानदेव महारनवर, रवि महारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा उमेदवार उभे होते.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात धायगुडे नाना बाबा 193, केसकर दशरथ दादा 206, केसकर महादेव दादा 214, महारनवर ज्ञानदेव मारुती 194, रुपनवर अमोल अंकुश 215, रुपनवर दादा काशिनाथ 239, रुपनवर कुंडलिक बापू 209, रुपनवर नितीन शिवाजी 212, महिला प्रतिनिधी मतदार संघात रूपनवर लक्ष्‍मीबाई दादा 236, रूपनवर शकुंतला बबन 228, अनुसूचित जाती/जमाती मतदार संघात सावंत आप्पा राम 242, भटक्या जमाती/विमुक्त जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदार गटात रुपनवर भाऊसो मच्छिंद्र 209 अशी मते पडलेली आहेत.

अपक्ष उमेदवार भटक्या जमाती/विमुक्त जमाती/विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघात रुपनवर अमोल अंकुश यांना 5 मते पडलेली आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर श्रीनाथ पॅनलच्या उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला‌ वाजत गाजत डोंबाळवाडीचे ग्रामदैवत श्रीनाथ मंदिर व सर्व देवांचा आशीर्वाद घेण्याकरिता पॅनल प्रमुख सर्व विजयी उमेदवार सभासद व ग्रामस्थ यांनी मोठी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता नातेपुते पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमेडद सोसायटीवर भाजप गटाचा झेंडा, राष्ट्रवादी गटाचा धुराळा उडवून पॅनलचा सुपडासाफ सभासदांनी केला
Next articleमांडवे ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत सौ. पुष्पाबाई पालवे व सौ. शोभाताई सिद यांच्यात समोरासमोर लढत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here