महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्या धर्मपत्नी सौ. रेश्माताई टेळे यांचे नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2021 – 22 मध्ये झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे माळशिरस तालुका अध्यक्ष सूर्यकांत उर्फ सुरेशभाऊ टेळे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. रेश्माताई यांचे माहेर तरंगफळ आहे. त्यांच्या रूपाने माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जिल्ह्याचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व माढा लोकसभेचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे व अनेक मनसे सैनिक, सुज्ञ मतदार व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकलेला आहे.
माळशिरस शहरामध्ये सौ. कांताबाई व श्री. केरबा टेळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. त्यांना सूर्यकांत उर्फ सुरेशभाऊ व देविदास अशी मुले आहेत. देविदास शेती व्यवसाय करीत असतात. सूर्यकांत यांना लहानपणापासून चळवळीमध्ये काम करण्याची सवय होती. राजकारण काय असतं हे माहीत नसताना सुरेशभाऊ अनेक वेळा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होते. सुरेश भाऊ यांच्यामध्ये संघटन कौशल्य व तरुणांना एकत्र आणण्याचे गुण असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राजसाहेब ठाकरे यांनी केल्यानंतर सुरेश भाऊ यांनी माळशिरस तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये स्थापनेपासून काम केलेले आहे. त्यांनी तालुका सरचिटणीस, सचिव अशा पदावर काम केलेले आहे. सुरेश भाऊ यांच्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यामुळे 2015 साली त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा दूध दरवाढ, उसाचा हमीभाव, वेगवेगळी आंदोलने केली. वेळ प्रसंगी जेलमध्ये सुद्धा जावे लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्तदान, वृक्षारोपण, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पानपोई असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेगळे स्थान निर्माण केले आहे. समाजकार्य करीत असताना राजकारणाची जोड असावी या उद्देशाने सुरेश भाऊ गतवेळच्या निवडणुकीत उभे होते. मात्र, त्यांना अपयश आले तरीसुद्धा अपयशाने खचून न जाता जनतेची सेवा करण्याचे काम सुरू होतेत्यांचे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी रेश्माताई यांचा सहभाग मोठा होता.

तरंगफळ येथील सौ. बाळूबाई व श्री. वामनराव गणपत तरंगे यांचे सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब आहे. वामनराव तरंगे वनपरिक्षेत्र कार्यालयात नोकरीस होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. त्यांना चार मुली सुनंदा, राणी, रेश्मा, अश्विनी आणि एक मुलगा हर्षवर्धन असा परिवार आहे. त्यापैकी रेश्माताई यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते दहावी श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज तरंगफळ येथे झालेले आहे. अकरावी व बारावी दयानंद विद्यालय सोलापूर येथे झालेले आहे. त्यांनी बीएची पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अकलूज येथे पूर्ण केली आहे. त्यांचा विवाह माळशिरस येथील युवा नेते सुरेशभाऊ यांच्याशी 2013 साली झालेला आहे. माहेरमध्ये सर्वसामान्य कुटुंब व सुसंस्कृत आचार विचार यामध्ये घडलेल्या रेश्माताई यांनी सासरच्या लोकांची मने जिंकलेली आहेत. माहेरी राजकारणाचा काहीही संबंध नव्हता. मात्र, पती सुरेश भाऊ राजकारणात असल्याने त्यांना सामाजिक कार्यात त्या नेहमी मदत करत असत. सुरेश भाऊ यांचा गत निवडणुकीत पराभव झालेला होता. पराभवाने खचून न जाता पती-पत्नीने सामाजिक कार्य सुरूच ठेवलेले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महाभयंकर संसर्ग रोगाच्या वेळी रक्ताची नाती लांब होती मात्र, माणुसकीची नाती जवळ होती. माणुसकीच्या नात्याने पती-पत्नीने कोरोना कालावधीत जनतेची सेवा केलेली होती. लाॅकडाऊच्या काळात अनेक छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद होते, अशावेळी सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आलेली होती. अशा कठीण परिस्थितीत टेळे परिवार यांनी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला वाटप करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलेला होता. कोरोनाचा वाढता प्रभाव अनेक रुग्ण दवाखान्यामध्ये ॲडमिट होते, अनेकांची घरून डबे येण्याची अडचण होती, ती अडचण दूर करण्यासाठी रेश्मा ताई यांनी सकाळ-संध्याकाळ स्वतः हाताने डबे बनवून सुरेश भाऊ दवाखान्यात घेऊन जात होते. अनेक लोकांना पती-पत्नीनी सामाजिक कार्याची ओळख करून दिली. अनेकांचे आशीर्वाद मिळाले. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर कंटेनमेंटझोन घोषित केला जात असत. त्यावेळेला अनेक कुटुंबांना घराच्या बाहेर पडता येत नव्हते, अशावेळी सुरेश भाऊ यांनी मित्रपरिवारासमवेत ओरीअर्स म्हणून काम केले. अनेक लोकांना घरपोच किराणा, भाजीपाला देण्याचे काम केले. रेश्माताई यांनी सामाजिक बांधिलकी जपत सीमेवर असणाऱ्या जवानांना राखी पाठवून बहिण भावाचं पवित्र नातं जपण्याचे काम करून जवानांच्यामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. रक्षाबंधनला सुरेश भाऊ यांनी सर्व जाती धर्मातील महिलांच्या हातून राखी बांधून भावाची भेट बहिणीला दिलेली होती. अशी अनेक कामे करण्याचे काम पती-पत्नीचे सुरू होते.
अशामध्येच माळशिरस नगरपंचायत निवडणूक बिगुल वाजला. सुरेशभाऊ यांनी काम केलेल्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडले. त्या प्रभागांमध्ये रेश्माताई यांनी स्थानिक आघाडीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. आजपर्यंत पती-पत्नीने केलेल्या कार्याची दखल मतदारांनी घेतली आणि माळशिरस तालुक्याने सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. सुरेश भाऊ यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल केलेली प्रसारमाध्यमांमधून राज साहेब ठाकरे यांना जिल्ह्याचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व माढा लोकसभेचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांच्या सहकार्याने वेळोवेळी दिलेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वसामान्य जनतेसाठी व तळागाळातील लोकांसाठी काम करीत असल्याने माळशिरस नगरपंचायतमध्ये सौ. रेश्माताई टेळे यांच्या रूपाने माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसेचा झेंडा नगरपंचायत सभागृहांमध्ये फडकला आहे. अनेक स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रभागांमधील प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेऊन यशाचा पेढा देण्याचे काम पती-पत्नी यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng