तरंगफळच्या माजी सरपंच रत्नमाला तरंगे यांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

तरंगफळ (बारामती झटका)

तरंगफळच्या माजी सरपंच सौ. रत्नमाला सुजित तरंगे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2019 जाहीर झाला होता. त्याचा वितरण समारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते पोलीस परेड ग्राउंड, सोलापूर येथे सकाळी नऊ वाजता आयोजित केला आहे.

सौ. रत्नमाला तरंगे यांनी तरंगफळ गावात जलसंधारण, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात भरीव कार्य केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर केला होता. त्यांना या अगोदर अनेक पुरस्कार मिळाले असून मोहिते पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाखाली तरंगफळमध्ये विविध विकासकामे राबविली आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ. रत्नमाला तरंगे यांचे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

त्याचबरोबर भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे साहेब, तालुका लागवड अधिकारी सौ. ससाने मॅडम, ॲड. शांतीलाल तरंगे, तरंगफळच्या नवनियुक्त सरपंच पद्मिनी नारायण तरंगे, अपंग संघटनेचे नेते गोरख जानकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि.सौ.कां. काजल ठवरे आणि चि. अजित नरूटे यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न
Next articleउपासक आकाश सावंत आणि उपासिका मधुलिका नवघरे यांचा मंगल परिणय होणार संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here