तरंगफळ गावची लेक, भांबुर्डी गावची सुन यमुना देशमुख भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंचायत समिती भांबुर्डी गणातून इच्छुक….

तरंगफळ ( बारामती झटका )

तरंगफळ गावातील स्व. नारायण महादव तरंगे यांची लेक भांबुर्डी गावच्या देशमुख परिवारातील सुन व भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटक सरचिटणीस संजयजी देशमुख यांच्या मातोश्री यमुनाबाई कांता देशमुख भांबुर्डी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत.

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गण रचना निश्चित होऊन आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. मांडवे जिल्हा परिषद गटात भांबुर्डी पंचायत समिती गण आहे. गणात भांबुर्डी 3732, तरंगफळ 1868, गोरडवाडी 2939, मेडद 3638, येळीव 1091, जाधववाडी 1903 अशी सहा गावे व 15171 मतदार आहेत.

माळशिरस तालुक्यात गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम संजय देशमुख प्रामाणिकपणे व पक्ष वाढीसाठी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. दोन टर्म त्यांच्याकडे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस पद आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयमालक देशमुख असताना सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायम प्रयत्न केला जात असे‌ तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत ते घेत होते.

माढा लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभा निवडणुकीत आ. राम सातपुते यांचे इमाने इतबारे काम केलेले होते. संजय देशमुख नाव घेतले की आपोआपच भाजपचे म्हणावे लागते, येवढे माळशिरस तालुक्यात भाजपचे काम त्यांनी केलेले आहे.

भांबुर्डी पंचायत समिती गणातून इच्छुक होते. गणात ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेले आहे. त्यामुळे मातोश्री यमुनाबाई देशमुख इच्छुक आहेत. नावात यमुना असल्याने मतदार संघातील सर्व गंगा, कावेरी, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, पंचगंगा, कृष्णा, भिमा, कोयना, सिंधू अशा सर्व सासर व माहेरच्या मैत्रीणी गोळा करून पंचायत समितीकडे प्रवाह वाहण्यासाठी भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जात आहे. लेकाचे कर्तुत्व मातेस उपयुक्त ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराज्यपालांच्या विरोधात युवा सेना नातेपुते यांच्यावतीने निषेध सह्यांची मोहीम
Next articleमाळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील बुजुर्ग व्यक्तीमत्व नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील याचा वाढदिवस…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here