माळशिरस ( बारामती झटका )
तरंगफळ येथील विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज पंचायत समिती माळशिरस येथे अधिकाऱ्यांना सूचना केल्या
आज माळशिरस पंचायत समिती येथे अधिकाऱ्यांसमवेत रणजीत दादा नी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विविध समस्यांचा आढावा घेतला यावेळी तरंगफळ चे माजी सरपंच सुजित तरंगे यांनी गोरडवाडी तरंगफळ रस्ता दुरुस्त व तरंगफळ मधील पाच पाझर तलावाचे खोलीकरण व पाझर बंद करण्याविषयी मागणी केली असता यावर रणजीतदादा यांनी अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या यावेळी अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनी तरंगफळ मधील वनविभाग क्षेत्रातील गट नंबर 99 येथील अडीच एकर क्षेत्रातील गाळ काढण्याविषयी दादांकडे मागणी केली यावेळी दादांनी तालुका वन अधिकारी कोकरे साहेब यांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जागेवरच दिले तसेच तरंगफळ येथील ज्ञानेश्वर शिंदे यांच्या कुटुंबातील गॅस दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना वरिष्ठ पातळीवरून मदत व पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले यावेळी जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते पाटील माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील माळशिरस तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी स्वस्त धान्य दुकान संघटनेचे तालुका अध्यक्ष महादेव तरंगे, तरंगफळ चे सरपंच माऊली कांबळे यांचे बंधू ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष गोविंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य महादेव ऊर्फ बापू गोरड, आरपीआयचे अध्यक्ष शशिकांत साळवे बापू गोरड सहदेव तरंगे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक संतोष पानसरे उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng