तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस येथील कुमारी अश्विनी संजय नरूटे वय 13 या मुलीचा सर्पदंशाने सोमवार दि. 20/03/2023 रोजी दुपारी मृत्यू झाला आहे.
कुमारी अश्विनी संजय नरूटे इयत्ता सहावी मध्ये श्रीनाथ विद्यालय तरंगफळ, वाघमोडे वस्ती येथे शिकत आहे. सकाळी अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर घरी आलेली होती. तिचे पत्र्याचे घर आहे. त्यामध्ये उंदराचा साप पाठलाग करीत होता. साप व उंदीर दोघेही पत्र्यावरून खाली जमिनीवर पडले होते. त्यावेळेस सापाने अश्विनी हिच्या पायाला दंश केलेला होता. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेलेले होते. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
कुमारी अश्विनी हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अश्विनी हिला आई, वडील, लहान भाऊ आहेत. आजी-आजोबा मेंढपाळ व्यवसाय करण्याकरता लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी गेलेले आहेत. आजी आजोबा आल्यानंतर कुमारी अश्विनी हिच्यावर पुढील अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय चुणचणीत व गोंडस असणारी अश्विनी हिच्या मृत्यूने नरूटे परिवारासह तरंगफळ गावावर शोककळा पसरलेली आहे.
कुमारी अश्विनीच्या मृतात्म्यास शांती लाभो व नरूटे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng