तरंगफळ ( बारामती झटका )

तरंगफळ ता. माळशिरस येथे रेणुका यल्लम्मा देवीची यात्रा गुरुवार दि. 15/11/2021 रोजी होणार असल्याचे तरंगफळ गावचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे यांनी जाहीर केले आहे. कोरोना संसर्ग रोगाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले होते. अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. शासनाने काही निर्बंध घालून दिले होते, त्यामुळे बाजार, जत्रा, यात्रा यावर बंदी होती. अनेक दिवस मंदिरे सुद्धा बंद होती. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असल्याने शासनाने मंदिरे खुली केलेली आहेत, बाजार सुरू झालेले आहेत, त्यामुळे छोट्या मोठ्या यात्रा सुरू झालेल्या आहेत.

तरंगफळ येथे रेणुका यल्लमा देवीचे जागृत देवस्थान आहे. या रेणुका देवीच्या यात्रेला गुरुवार दि. 18/11/2021 रोजी चोळी पातळ देवीला अर्पण करून सुरुवात होणार आहे. शुक्रवार दि. 19/11/2021 रोजी दुपारी 12.30 वा. गंध लिंबाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. 8.30 वा. गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 20/11/2021 रोजी 12.30 वा. होम कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील यल्लमा देवी भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन तरंगफळ गावचे लोकनियुक्त सरपंच व यात्रा कमिटीचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng