तरुणांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता इतर व्यवसायाकडे वळण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

बारामती (बारामती झटका)

आपल्यातील मुले मुली स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी नवीन एखादा व्यवसाय करू पाहत आहेत, अशा कार्यक्रमांना जाऊन त्यांना शुभेच्छा देण्याचा नेहमीच माझा व दत्तामामा भरणे यांचा प्रयत्न राहिलेला आहे. मा. पवार साहेब यांची गेल्या ५०-६० वर्षाची शिकवण आहे की, केवळ फक्त शेती करण्यापेक्षा घरातील एखाद्या व्यक्तीने शेती उद्योग करावा व बाकीच्यांनी इतर व्यवसायाकडे वळण्याचे धाडस दाखवावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले. डॉ. सुजित वाघमोडे व सौ. कल्याणी वाघमोडे यांच्या “ओम इंटरप्राईजेस” या नवीन व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी मा. ना. अजितदादा बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा. ना. दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदनदादा देवकाते, बारामती नगर परिषद नगराध्यक्षा सौ. पोर्णिमाताई तावरे, बारामती नगर परिषदेचे माजी गटनेते दीपक मलगुंडे, फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, आस्था टाईमचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, ल्युमिनस कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर विभव भार्गव तसेच टाटा कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल भामरे, ओंकार टेन्को पुण्याचे सौ. स्मिता व शिरीष नगरकर, धनंजय जामदार, बारामती नगरपरिषद नगरसेविका नीलिमा मलगुंडे, जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती भाऊसाहेब करे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे अजितदादा पवार म्हणाले की, आपल्या देशामध्ये नवीन नवीन उद्योग उभे राहत आहे‌त. आपण बारामती येथील शिरसुफळ या गावाच्या परिसरात २५९ एकरामध्ये ५० मेगावॅट वीज तयार होईल एवढा हब केला आहे. मात्र असे हब करीत असताना त्या ठिकाणी झाडे अजिबात नसावीत व उन्हाची तीव्रता जास्त असावी लागते, अशा ठिकाणी हे सोलर हब यशस्वी होताना आपण पाहिले आहेत. तर आपल्या देशात राजस्थानमधील सौराष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोलर हब उभे राहिले आहेत. आता पूर्वीपेक्षा सोलर हब उभे करण्यासाठी पूर्वीपेक्षा कमी खर्च येत आहे. असे सांगून पवार म्हणाले, असे हब तयार होणे खूप महत्त्वाचे आहे तरच आपण विजेचा तुटवडा भरून काढू शकतो. खरंतर आता पाण्यावर वीज तयार करण्यापेक्षा हे पाणी शेती उद्योगाला व पिण्याला देणे गरजेचे असल्याने तसा आमचा प्रयत्न चाललेला आहे. कारण भविष्यामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. मात्र वाऱ्यापासून मिळणारी वीज पाहिजे तेव्हा मिळत नाही. तसेच सूर्यापासून मिळणारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मिळते आपल्या घरातील विजेचा तुटवडा आपण या सोलर पॅनेल बसवून आपणाला पाहिजे तेवढी वीज तयार करू शकतो. त्यामुळे महावितरणच्या विजेवर आपणाला अवलंबून राहण्याची काही कारण नाही, असे सांगून पुढे अजित दादा म्हणाले की, भविष्यामध्ये इंधनाच्या खूप मोठा तुटवडा भासणार असून पेट्रोल, डिझेल यांच्या किमती आपण नियंत्रणात ठेवू शकत नाही. याला पर्याय म्हणून पेट्रोल, डिझेल गाड्या वापरण्यापेक्षा इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे लोकांचे प्रमाण वाढते आहे, ही चांगली गोष्ट आहे. असे हि शेवटी अजितदादा म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कल्याणी वाघमोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर बुरुंगले यांनी केले. या कार्यक्रमास ज्ञानेश्वर जगताप, सलीम सय्यद, माजी विक्री कर उपायुक्त प्रशांत सातव, डॉ. देवकाते, डॉ. विजय कोकणे, डॉ. स्मिता बोके, डॉ. सुप्रिया गदादे, डॉ. अश्विन वाघमोडे, डॉ. सागर नेवसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचाकोरे गावात ॲड. विकास शिंदे, हरिभाऊ माने, छाया वाघमोडे, एकाच दिवशी तीन प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम.
Next articleशेंडेवाडी तामशिदवाडी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांसाठी ३९ उमेदवार तिरंगी लढत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here