बेकायदेशीर रस्ता बनवण्याचे कृत्य करणाऱ्या तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची खातेनिहाय चौकशी करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा कण्हेर गावातील शेतकऱ्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटने समवेत इशारा.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून रस्ता बनवण्याचे बेकायदेशीर कृत्य केलेले असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करून आमचे वरील अन्याय थांबवावा अन्यथा 14/3/2022 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल, असा इशारा कन्हेर ता. माळशिरस येथील शेतकरी संजय एकनाथ माने, सचिन सखाराम माने, पोपट भानुदास माने, सुभाष एकनाथ माने, विजय तुकाराम माने यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे सदर निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव महसूल महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेले आहेत सदरचे निवेदन देत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर, समाधान काळे आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी अकलूज-विभाग माळशिरस यांना दिलेल्या निवेदनामध्ये रस्ता केस नं.40/2018 ही केस कन्हेर गट नंबर 299 व 302 चे पुर्व उत्तर कोपऱ्यापासून गट नं.318 पर्यंत पूर्व पश्चिम चालीचा सर्वे नंबरच्या बांधावरून ग्रामपंचायत कण्हेर यांच्या मालकीचे गट नंबर 291 मधील चालू वहिवाटीच्या दक्षिण-उत्तर चालीच्या रस्त्यास मिळणेसाठी कन्हेर भांब डांबरी रस्त्यात मिळणारा नवीन गाडी रस्ता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे आमच्या विरुद्ध दाखल केला त्यामध्ये तहसीलदार माळशिरस यांनी दि. 14/02/2019 रोजी कन्हेर गट नंबर 303 व 299,303 चे उत्तर बांधावरून व 299 चे दक्षिण बांधावरून रस्ता मागणी मान्य केली. सदरचा तहसीलदार यांचा आदेश हा मुळातच बेकायदेशीर आहे. कारण सदर रस्ता केस मधील वादिनी गट नंबर 303 ,300 व 299 चे बांधावरून कधीही रस्ता मागितलेला नव्हता असे असताना मागणी पेक्षा जास्त लाभ तहसीलदाराने त्या वादीच्या बाजूने दिला आहे. त्यांचे विरुद्ध माळशिरस दिवाणी न्यायालयात रे.मु. नंबर 349/ 2019 हा दावा दाखल केलेला असून तो प्रलंबित आहे. त्या दाव्यात अद्याप सदरचा आदेश कायम झालेला नाही. दाव्याची चौकशी चालू असताना माळशिरस तहसीलदार निंबाळकर यांनी आदेश न पाहता व आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता नोटीस न काढता दि. 27/01/2022 रोजी मारुती सरगर आदी लोकांशी संगणमत करून आर्थिक आमिषे व प्रलोभनांना बळी पडून पोलिसांचे बळावर तत्कालीन तहसीलदार यांनी बांधावरून रस्ता मंजूर केला असताना या तहसीलदाराने आमचे जमिनीतून पोलीस बळाचा वापर करून पोलिसांचे धाकावर भ्रष्टाचार करून अतिक्रमण केले व रस्ता खुला केल्याचा खोटा पंचनामा केला. त्यामध्ये खोटा जबाब घेतले व रस्ता केस नंबर 40 /20 18 चे आदेशानुसार गटातून रस्ता मंडलाधिकारी माळशिरस यांनी अतिक्रमण करून निर्माण केल्याचे जबाब घेतले व सदरचे बेकायदेशीर कृत्य हे तहसीलदार माळशिरस यांनी केलेले आहे. पुन्हा माळशिरस तहसीलदार निंबाळकर यांनी दि. 16/02/2022 रोजी पोलीस बळाचे जोरावर आमचे जमिनीतून मुरूम टाकण्यासाठी व पाईप काढण्यासाठी आले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे परत गेलेले आहेत. मारुती सरगर वगैरे लोकांनी तहसीलदार निंबाळकर यांना फार मोठी आर्थिक रक्कम दिलेली आहे. व त्या आर्थिक रकमेला बळी पडून तहसीलदार निंबाळकर हे आमच्या जमिनीतून पोलिसांना पत्र देऊन पोलिस बळाचा वापर करून अतिक्रमण करणार आहेत.
त्यामुळे आमच्या उभ्या पिकाचे नुकसान करून तहसीलदार माळशिरस हे आमचे जमिनीतून अतिक्रमण करून रस्ता तयार करणार आहेत. अशी आमची खात्री झालेली आहे व तसे मारुती सरगर वगैरे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आम्हाला आमचे पिकाचे नुकसान करणारे तहसीलदार माळशिरस निंबाळकर यांचे कृत्य आमच्यावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे तहसीलदार माळशिरस बेकायदेशीर कृत्याबाबत व गैरकृत्य याबाबत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. आदेशाचे बाहेर जाऊन आमचे जमिनीतून अतिक्रमण करून रस्ता करू नये यासाठी आम्ही सी.पी.सी .कलम 80 प्रमाणे नोटीस दिलेली आहे. तरीही त्या नोटीसला न जुमानता तहसीलदार हे आमचे जमिनीतून रस्ता करणार आहेत. तशी महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966 चे कलम 143 प्रमाणे बांधा व्यतिरिक्त कसलाही रस्ता देत नाहीत. तरीही तहसीलदार हे बांधावरून नव्हे तर आदेशाचे बाहेर जाऊन जमिनीत अतिक्रमण मुरूम टाकून रस्ता करणार आहेत. तसे झाल्यास उभ्या पिकाचे नुकसान होणार आहे व आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी या निवेदनाद्वारे आपणास कळवितो की, तहसीलदार निंबाळकर माळशिरस कण्हेर गट नंबर 300, 301 ,302 ,303, 299 या जमिनीतून अतिक्रमण करून मुरूम टाकून आर्थिक आमिषे व प्रलोभनांना बळी पडून पिकाचे नुकसान करून रस्ता करणार आहेत.
तहसीलदार माळशिरस यांची खातेनिहाय चौकशी करून तोपर्यंत त्यांना निलंबन अथवा बडतर्फी करण्यात यावी. कर्तव्यात कसूर व बेकायदेशीर कृत्य दि. 27/01/2022 रोजी करून बांधावरून नव्हे तर जमिनीतून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने माळशिरस तहसीलदार निंबाळकर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. बेकायदेशीर कृत्य त्वरित थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा आम्ही आपले कार्यालयासमोर दि. 14/03/2022 रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचे संजय एकनाथ माने वगैरे शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng