तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची सदाशिवनगर साखर कारखान्याच्या बेमुदत धरणे आंदोलनास सदिच्छा भेट.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना प्रशासन व बेमुदत धरणे आंदोलक शेतकरी यांच्यात समन्वय साधण्याकरता तहसीलदार जगदीश निंबाळकर यांचे प्रयत्न

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखाना स्थळावर मोहिते पाटील गटाचे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय शेतकरी संघटना व ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा दहावा दिवस. या दिवशी माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. त्यांच्या समवेत निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख उपस्थित होते.

बेमुदत धरणे आंदोलनातील आंदोलन कर्ते माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंतराव पालवे पाटील, मधुकर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर, माळशिरस नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मारुतीराव पाटील, ज्येष्ठ नेते बाजीराव माने पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस शामराव बंडगर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, गुरसाळे ग्रामपंचायतचे सदस्य गणेश काटे, युवा नेते तुषार पाटील, पैलवान दादा भांगे, गोरडवाडीचे माजी चेअरमन संतोष गोरड, फोंडशिरसचे रामभाऊ पाटील, महेश शेटे, सचिन रुपनवर, इस्लामपूरचे युवा नेते विकास देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झुंजार कार्यकर्ते समाधान काळे, दादासो वाघंबरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याकडे थकित एफ आर पी व कामगारांचे वेतन यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. याची दखल घेत माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी आंदोलन कर्ते व उपोषण कर्ते यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने कारखाना प्रशासन व आंदोलन कर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. दोन्हीही बाजू ऐकून तहसीलदार जगदीश निंबाळकर लवकरच निर्णय घेतील, असा आत्मविश्वास आंदोलन कर्ते यांच्यामधून व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअंकोलीत श्री भैरवनाथाच्या जन्माष्टमी सोहळ्यानिमीत्त धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन
Next articleसोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काकासाहेब मोटे यांचा माळशिरस तालुक्यात झंझावाती दौरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here