तांदुळवाडी ( बारामती झटका )
हनुमान हायस्कूल व जुनिअर कॉलेज, तांदुळवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील श्री. एन. डी. कोडग सर लिखित शिक्षण व सेवेचा प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य मारुती देवकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रकाशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ‘शिक्षण व सेवेचा प्रवास’ हे पुस्तक प्रशालेचे प्राचार्य श्री. मारुती देवकर सर यांच्याकडे सादर केले. त्यावेळी प्रशालेतील सर्व स्टाफ उपस्थित होता. सर्वांनी श्री. कोडग सरांचे हार्दिक अभिनंदन केले. श्री. कोडग सरांनी सर्वांचे आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng