मोहिते पाटील समर्थक असणारे श्रीराम व हनुमान पॅनल एकत्र असून सुद्धा यंग जनरेशन सरस ठरले आहेत., शतकानंतर मतदारांना स्वातंत्र्य मिळाले.
तांदुळवाडी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातील तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर मोहिते पाटील व समर्थक यांचे राजकारण टिकून होते गावामध्ये सर्व परिचित असणारे श्रीराम व हनुमान असे दोन पॅनल होते. या दोन्ही पॅनल एकत्र असून यंग जनरेशन त्यामध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. नागेश काकडे उपसरपंच शशिकांत कदम पाटील, अशोक जाधव, अभिमान मिले, ज्ञानेश्वर उघडे, राम कृष्ण चव्हाण, दिलीप कदम, बळीराम जाधव, अनिल शेळके, चंद्रकांत लोखंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन तांदळवाडी सोसायटीत मोहिते पाटील श्रीराम व हनुमान गटाचा धुरळा उडवून देऊन पॅनलचा सुपडासाफ केलेला आहे.
सर्व उमेदवारांचा त्रिफळा अडीचशे मतांच्या फरकाने उडविलेला आहे. मोहिते पाटील समर्थक असणारे मुरब्बी राजकारणी श्रीराम व हनुमान पॅनलचे एकत्र असून सुद्धा यंग जनरेशन सरस ठरलेले आहेत. सोसायटीच्या शतकानंतर मतदारांना स्वातंत्र्य मिळाले असल्याची भावना मतदारांनी व्यक्त केलेली आहे.
तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व तेरा जागांवर विजय मिळवून मोहिते पाटील समर्थक यांना पराभवाची धूळ चारली आहे. अकलूज सहायक निबंधक कार्यालयाचे एस. व्ही. कोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सोसायटीचे सचिव मारुती मोकळे यांनी सहकार्य केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेळापूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात बाबर हनुमंत धोंडी 481, चव्हाण दामोदर भाऊ 455, चव्हाण दत्तू महादेव 651, चव्हाण नामदेव गोविंद 557, चव्हाण शिवाजी ज्ञानोबा 437, चव्हाण तानाजी संतराम 435, चव्हाण विश्वंभर सदाशिव 668, देशमुख बापू रामचंद्र 626, डोके चंद्रकांत संभाजी 631, जरे युवराज भीमराव 434, कदम नंदकुमार भीमराव 642, काकडे अर्जुन गोरख 442, मिले दशरथ गणपत 637, मिले जयसिंग सदाशिव 434, राजगुडे उदयसिंग ज्ञानेश्वर 670, उघडे राहुल राजशेखर 643, महिला प्रतिनिधी गटात गाडगे लताबाई तुकाराम 467, काकडे शारदा तुकाराम 677, करांडे गयाबाई दत्तात्रेय 647, कवडे अश्विनी ज्योतीराम 471, अनुसूचित जाती जमाती गटात लोखंडे दशरथ नामदेव 462, लोखंडे शहाजी आप्पा 677, इतर मागासवर्गीय गटात गुजरे गणपत महादेव 655, राऊत मनीषा शहाजी 485, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बिनविरोध चव्हाण धनाजी आप्पा झालेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng