तांबेवाडी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील तांबेवाडी ग्रामपंचायत थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी अविनाश छगन देवकर व संताजी मुरलीधर बोडरे यांच्यात समोरासमोर लढत लागलेली आहे तर ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व 7 सदस्य बिनविरोध झालेले आहेत.
तांबेवाडी ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये रेश्मा रामचंद्र पवार रतन सुभाष साळुंखे सागर मधुकर तांबे वार्ड क्रमांक 2 चंपावती तुषार भोईटे भगवंत मल्हारी जानकर वार्ड क्रमांक 3 हेमा किशोर साळुंखे भगवान रामचंद्र ऐवळे असे 7 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत सरपंच पदाची निवडणूक लागलेली असून देवकर यांना कपबशी चिन्ह तर बोडरे यांना छताचा पंखा चिन्ह मिळालेली आहेत माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तांबेवाडी ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी पी.व्ही.सुळ काम पाहत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng