उमलते युवानेतृत्व सिद्धिविनायक डेव्हलपर्स ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सचिन देशमुख ऊर्फ तात्यासाहेब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकाभाऊ देशमुख यांच्या विचाराने प्रेरित होऊन माळशिरस शहरामध्ये उमलते युवा नेतृत्व सिद्धिविनायक डेव्हलपर्स ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सचिन देशमुख ऊर्फ तात्यासाहेब यांचा वाढदिवस दि. 2 ऑक्टोंबर रोजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम राबवून संपन्न झाला. यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथ मुलांना ड्रेस, शूज, शालेय साहित्य व फळे वाटप करून अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर समाधान आणले होते.

यावेळी बोलताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर बोलताना म्हणाले, एखाद्यावर जीव ओवाळून टाकणे, रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन प्रेम करणे, असे उदार नेतृत्व माळशिरस तालुक्याला लाभले आहे. तात्यांकडे पाहून लढण्याची जिद्द निर्माण होते, नवीन काही शिकायला मिळते. तात्यांच्या वाढदिवसाला झालेली ही गर्दी म्हणजे लोकांचं तात्यांवरचं प्रेम आहे. एका सर्व सामान्य कुटुंबामधून येऊन तात्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये आपलं एक अस विश्व निर्माण केलं आहे. असे सांगून सचिन देशमुख उर्फ तात्या यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

युवा नेते सचिन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस शहरामध्ये चौकाचौकात मुख्य रस्त्यावर शुभेच्छांचे बॅनर सिद्धिविनायक ग्रुप व तुकारामभाऊ देशमुख मित्र मंडळाच्यावतीने लावण्यात आलेले होते. म्हसवड रोड येथील अर्चना मंगल कार्यालय या ठिकाणी तात्या साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. हा सोहळा सिद्धिविनायक ग्रुपचे विठ्ठल ठोंबरे, अजित बाविस्कर, दिनेशशेठ धाईंजे व तुकारामभाऊ देशमुख मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

सदरच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे, माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकारामभाऊ देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, निर्मिती इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठनेते विकासदादा धाईंजे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील, अनिल सावंत, नातेपुते ग्रामपंचायतीचे सदस्य युवानेते संदीपदादा ठोंबरे, ॲड. रावसाहेब पांढरे, सचिन पडळकर, शिवराज पुकळे, डॉ. सर्जे, नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, आण्णासाहेब शिंदे, ॲड. पालवे, अमोल वराडे, वस्ताद बिट्टू अण्णा काळे, बाळू काळे, अरुण पांढरे, आण्णा पांढरे, राजेंद्र काळे, अभिनित काळे, संतोष देवकाते, प्रेम भैया देवकते मित्र परिवार, डॉ. तुकाराम ठवरे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थिती ध्ये तात्यासाहेब यांचा जंगी सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी गोरडवाडी गावचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांची ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर मनपसंत प्रीती भोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता देशमुख परिवार व सिद्धिविनायक ग्रुपचे कार्यकर्ते, मारुती देशमुख, अशोकदादा देशमुख, दादासाहेब देशमुख, टि. डी. देशमुख, अनिल देशमुख, पांडुरंग देशमुख, हनुमंत देशमुख, विठ्ठल देशमुख, रविराज खुसपे, सुनील देशमुख, सतीश चोरमले, करे परिवार, सुनील कोळेकर, राजू धायगुडे, गणेश देशमुख, राजाभाऊ देशमुख, मारुती खुसपे, बापूराव खुसपे, बंटी देशमुख, सनी देशमुख, भैया देशमुख, प्रताप देशमुख, भीमराव देशमुख, संतोष देशमुख, पप्पू देशमुख, रामभाऊ देशमुख, योगेश देशमुख आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng