माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील एकूण १५ ग्रामपंचायतीतील १७ सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाला आहे. याबाबतची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दि. ३० नोव्हेंबर ते दि. ६ डिसेंबरपर्यंत त्रुटी वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. ७ डिसेंबर रोजी ११ वा. करण्यात येईल. दि. ९ डिसेंबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, छाननी, माघार हे सर्व तहसील कार्यालय माळशिरस येथे निवडणूक निर्णय अधिकारी कक्षामध्ये होईल.
१) कारुंडे प्रभाग ३
२) गुरसाळे प्रभाग ५
३) तांबेवाडी प्रभाग २, प्रभाग ३
४) कन्हेर प्रभाग ३
५) पिलीव प्रभाग २
६) झिंजेवस्ती प्रभाग ३ मधील २ सदस्य
७) यशवंतनगर प्रभाग ५
८) शिंदेवाडी प्रभाग १
९) मेडद प्रभाग ५
१०) चाकोरे प्रभाग ४
११) उघडेवाडी प्रभाग ३
१२) संगम प्रभाग ३
१३) भांबुर्डी प्रभाग ५
१४) जांभूड प्रभाग ३
१५) वेळापूर प्रभाग ५
हे मतदान दि. २१ डिसेंबर रोजी स. ७.३० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत होईल तर मतमोजणी दि. २२ डिसेंबर रोजी होईल.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng