माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यामध्ये शेतीपंपाची विज कट करण्याची मोहीम गेली चार-पाच दिवस झाले चालू आहे. तसेच ट्रांसफार्मर सोडवण्याचे काम चालू आहे, त्यामुळे गेली तीनचार दिवसांपासून लाईट बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तात्काळ वीज कट करण्याची व ट्रान्सफर बंद करण्याची चालू असलेली मोहीम बंद करून विज पुरवठा सुरळीत करण्यासाठीचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनामध्ये तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत नाही केला तर, माळशिरस तालुक्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशाराही तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता ओंबासे साहेब यांना दिला. यावेळी तालुकाध्यक्ष अजित बोरकर, रद्द संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, माळशिरस विधानसभा प्रमुख साहिल आतार, शिवराम गायकवाड, समाधान काळे, सचिन बोरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng