तिरवंडी ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या तिरंगी लढतीत युवा नेते शामराव बंडगर यांचा दैदीप्यमान विजय…

माळशिरस तालुक्याच्या सक्रिय राजकारणात युवा नेते शामराव बंडगर यांचा राजकीय, सामाजिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर…

माळशिरस ( बारामती झटका )

तिरवंडी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या चुरशीच्या निवडणुकीत वार्ड क्र. २ मध्ये तिरंगी लढत लागलेली होती. या लक्षवेधी लढतीत युवा नेते शामराव बलभीम बंडगर यांनी दैदिप्यमान विजय मिळवलेला आहे. माळशिरस तालुक्याच्या सक्रिय राजकारणात युवा नेते शामराव बंडगर यांचा राजकीय, सामाजिक कार्यक्रमात नेहमी सहभाग असतो.

शामराव बंडगर यांची सर्वसामान्य परिस्थिती आहे. परिस्थिती जरी गरीब असली तरी मनाची श्रीमंती असणारे शामराव बंडगर सुपरिचित आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदारांनी निवडून दिलेले होते, त्या संधीचे सोने शामराव बंडगर यांनी गावांमध्ये अनेक विकासकामे करून केले आहे. युवानेते शामराव बंडगर हे सर्वसामान्य जनतेच्या व्यक्तिगत कामासाठी नेहमी उपयोगी पडलेले आहेत. गावांमध्ये अनेक प्रलंबित प्रश्नासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत कामे केलेली आहेत. गावाच्या हितासाठी सामाजिक कार्य करीत असताना अनेकवेळा आंदोलने, उपोषणे केलेली आहेत. त्यांचा तालुक्यामध्ये सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभाग असतो.

शामराव बंडगर यांनी गेल्या वेळेस केलेल्या विकासकामांच्या जोरावर व स्वाभिमानी शंभू हनुमान पॅनलमधील सर्व नेते व कार्यकर्ते याचबरोबर थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार नानासाहेब दादा वाघमोडे यांचेही मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभलेले आहे. वार्ड क्र. २ मध्ये प्रभाग रचनेत बाहेरून अडीचशे मतदार विरोधी गटाचे वाढलेले होते. त्यातच तिरंगी लढत लागलेली होती. विरोधकांचे लक्ष शामराव यांच्या पराभवाकडे होते मात्र, पॅनलमधील सर्व नेते व कार्यकर्ते आणि शामराव बंडगर यांचे व्यक्तिगत कार्य व जनसंपर्क यामुळे शामराव बंडगर यांनी तिरंगी लढतीत विजय संपादन केलेला आहे. शामराव बंडगर यांचे चिन्ह छताचा पंखा हे होते.

शामराव बंडगर यांच्या राजकीय वाटचालीत अनेक लोकांचा सिंहाचा वाटा आहे. भविष्यात शामराव बंडगर यांच्यावर मतदारांनी टाकलेला विश्वास निश्चितपणे सार्थ करून थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच नानासाहेब वाघमोडे यांच्या खांद्याला खांदा लावून तिरवंडी गाव माळशिरस तालुक्यामध्ये आदर्श व विकासप्रिय कसे होईल, यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास शामराव बंडगर यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleExpanding Competence in Information Solutions
Next articleवयाची शतके पुर्ण झालेल्या पणजोबांनी उभयतांसह एक वर्षाच्या पणतूचा (अधिराजचा) आनंदाने केला वाढदिवस साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here