अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जूनसिंह मोहिते पाटील यांच्यावतीने सन्मान संपन्न
अकलूज ( बारामती झटका )
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी तिरवंडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन संतोष सरगर व संचालक यांचा सन्मान केला. तिरवंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तिरवंडी या सोसायटीवर सत्ता बदल होऊन सत्ताधाऱ्यांचा धुराळा उडवून सुपडा साफ केलेला होता.

तिरवंडी गावांमधील गट तट पक्ष विसरून समविचारी लोक एकत्र येऊन सोसायटीची निवडणूक लढवलेली होती. तेराच्या तेरा संचालक दैदीप्यमान मताने विजयी झालेले होते. तेरा संचालकांमध्ये संतोष सरगर यांनी सर्वात जास्त 299 मते घेऊन दैदीप्यमान विजय मिळवलेला होता. संतोष सरगर यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड केल्यानंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी नूतन चेअरमन व संचालक यांचा सन्मान केला. यावेळी नूतन चेअरमन संतोष सरगर संचालक, हरिभाऊ वाघमोडे, बबन वाघमोडे, मधुकर माने, भाऊ सदाशिव वाघमोडे, हनुमंत ताटे, अशोक सपकाळे, यांच्यासह नाना पाटील, माऊली सरगर, महादेव उर्फ एमडी सरगर, शंकर गंगाराम वाघमोडे, बापूराव सरगर, अंकुश सरगर, भगवान गंगाराम वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तिरवंडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या विजयाचे अनेक शिलेदार आहेत. त्यापैकी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव उर्फ एमडी सरगर यांचा सन्मान मदनसिंह मोहिते पाटील यांनी केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
