ग्रामदैवत मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून भव्य रॅलीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह शक्तिप्रदर्शनाचे आदर्श दर्शन.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माळशिरस शहराचे माजी सरपंच संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख गटाचे नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराने उमेदवारी अर्ज माळशिरसचे ग्रामदैवत मारुती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून केला आहे. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भव्य शक्ती प्रदर्शनाचे आदर्श दर्शन पहावयास मिळाले.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये तुकाराम रामचंद्र देशमुख, सचिन शिवाजी वावरे, रणजित सोपान काळे, शिवाजी ज्ञानदेव देशमुख, सचिन महादेव टेळे, अनिल किसन सावंत, रघुनाथ पांडुरंग चव्हाण, राणी अनिल देशमुख, अश्विनी महादेव वाघमोडे, प्रियांका धनाजी टेळे, मनीषा पांडुरंग वाघमोडे, सोनाली अमोल पिसे, अनिता सर्जेराव काळे, स्वाती पांडुरंग शिंदे, मंगल हनुमंत जमदाडे, रंजना सुभाष धाईंजे आदींनी उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस यांच्याकडे अर्ज दाखल केलेले आहेत. उर्वरित अर्ज उद्या दाखल होणार आहेत.

माळशिरस नगरपंचायतची दुसऱ्या वेळेस निवडणूक होत असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
