तुपे वस्ती शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुपे वस्ती (मेडद) ता. माळशिरस, या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेमधील यशाची परंपरा कायम ठेवली आहे. दि. 12 ऑगस्ट 2019 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) शाळेच्या चि. सुजल सुखदेव कदम व कु. ऋतुजा अजिनाथ कोळी या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून असून कुमारी ऋतुजा आजिनाथ कोळी हीची नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. तसेच सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत चि. अविष्कार विजय शेंडे, कु. सायली शिवाजी लवटे व कु. रिया नवनाथ जगताप या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते, तर चि. अविष्कार विजय शेंडे याची नवोदय विद्यालयसाठी निवड झालेली होती.

कोरोना काळात शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन नियमित चालू होते. या सर्व मुलांना वर्गशिक्षक श्री. दत्तात्रय माने यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, केंद्रप्रमुख दशरथ रणदिवे, मुख्याध्यापिका सौ. संजीवनी जाधव, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष व सर्व सदस्य पालक यांनी अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाळुंग श्रीपुर नगरपंचायत सत्तास्थापनेत राष्ट्रवादीस समर्थन देणाऱ्या उमेदवारांना नामदार करणार.
Next articleपुरंदावडेत दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा, नगरसेवक आणि सरपंचांचा सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here