तृतीयपंथीयांनी मतदान नोंदणी अभियानात सहभागी व्हावे – सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे.

तृतीयपंथीयांसाठी मतदान नोंदणीच्या शिबिराचे आयोजन करण्याबाबतचे मंडल अधिकारी यांना निवेदन

माळशिरस (बारामती झटका)

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून दि. ३१ मार्च हा दिवस साजरा केला जातो. तृतीयपंथीयांनी अभियानात सहभागी राहावे, असे आवाहन तरंगफळ गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे यांनी केलेले आहे. यावेळी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माळशिरस तालुका प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख जानकर व इतर उपस्थित होते

दि. २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ हा तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणी चा विशेष सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेला आहे. तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्याबाबतचे निवेदन माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर, पिलीव, इस्लामपूर, दहिगाव, नातेपुते, अकलूज, माळशिरस आणि खुडुस येथील मंडळ अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.

सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त नाव नोंदणी करायची आहे. त्या अनुषंगाने खालील नमूद केलेले विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे. शिबिराच्या दिवशी अधिनस्त असलेले सर्व तलाठी व बीएलओ यांना उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना द्याव्यात.
१. आपल्या मंडळांमधील तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांना सदर दिनाबाबत आणि त्या निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या विशेष मतदान नोंदणी शिबिराबाबत माहिती देऊन त्यांचे सहकार्य घेण्यात यावे.
२. जास्तीत जास्त तृतीयपंथीयांची नाव नोंदणी होईल, यासाठी आपले अधिनस्त असलेले तलाठी यांना पुरेशा प्रमाणात विविध माध्यमांद्वारे विशेष शिबिर आयोजनाबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी सांगण्यात यावे.
३. तृतीयपंथीयांच्या मतदार नाव नोंदणीसाठी त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
४. तृतीयपंथीयांचे नवीन नाव नोंदणीसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड तसेच त्यांच्याकडे पुढील कागदपत्र उपलब्ध असतील तर, (उदा. रेशन कार्ड, शाळेचा दाखला, जन्मदाखला) सोबत घेऊन येण्याबाबत कळवावे.

तसेच दि. ३०/३/२०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तृतीय पंथी मतदार नवीन नाव नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय, माळशिरस येथील मिटिंग हॉलमध्ये करण्यात आलेले आहे. तसेच इतर मंडळांमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरामधील प्राप्त झालेल्या फॉर्मची आकडेवारी दि. २/४/२०२२ पर्यंत कळविण्यात यावी. यामध्ये विलंब अथवा टाळाटाळ होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच ज्यांना तृतीय पंथी मतदार यांना कॅम्प दिवशी शक्य होणार नाही अशांनी दि. २/४/२०२२ पर्यंत तहसील कार्यालय माळशिरस येथील निवडणूक शाखा या ठिकाणी नवीन नाव नोंदणीचे फॉर्म जमा करावेत.
सदर माहितीचे पत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर आणि मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना देण्यात आलेले आहे.

Previous articleमारकडवाडी येथे हळदी कुंकू, सुवासिनी कार्यक्रम व भव्य आराधी मंडळांच्या स्पर्धेचे आयोजन
Next articleलोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांनी राज्याबाहेरही केली कामगिरी फत्ते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here