“ते पत्र म्हणजे सरकारचा निर्णय नव्हे”, एकरकमी FRP बाबतच्या पियुष गोयल यांच्या पत्रावर “स्वाभिमानी” ची भुमिका..

शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली एफआरपीसाठी संघर्ष सुरू होणार – राज्य प्रवक्ता रणजित बागल

पंढरपूर ( बारामती झटका )

काल वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी “एफआरपी”चे तुकडे केले जाणार नाहीत, अशा आशयाचे पत्र राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यातील एक विधानपरिषद सदस्य यांना दिले आहे. ते पत्र फक्त आणि फक्त एकरकमी FRP चा उभारलेला लढा कमकुवत करण्यासाठीचा खेळलेला एक डाव आहे असे “स्वाभिमानी” चे मत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या केंद्रसरकारची FRP चे तुकडीकरण करण्याचा कायदा करण्याची तयारी चालु आहे.

जर मोदी सरकारला FRP चे तुकडीकरण करायचे नाही तर मग केंद्राने निती आयोगाचे सदस्य श्री. रमेशचंद्रन् यांच्या अध्यक्षतेखाली एफआरपीच्या तुकडीकरणाबाबत निर्णयासाठी समिती का नेमली गेली याचे उत्तर द्यावे. जर तुकडे करायचे नाहीत तर श्री. रामचंद्रन् यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने कृषिमूल्य आयोग (जो की केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो व त्याचे प्रमुख हे सरकारमधील लोक आहेत) या आयोगाच्या तुकडीकरणबाबत शिफारसी का मागवून घेतल्या आहेत.

हा डाव फक्त केंद्र सरकारचा नाही तर यात महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार देखील सामिल आहे. रामचंद्रन यांच्या समितीने प्रत्येक राज्य सरकारला या तुकडीकरणाच्या कायद्याबाबत अभिप्राय मागितले असता आपल्या “जाणत्या राज्याच्या” राज्य सरकारने त्याला संमती देखील देत या निर्णयास पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या कायद्याच्या निर्मितीत केंद्राप्रमाणेच राज्य सरकार देखील सामिल आहे.

आता राहिला विषय या पत्राचा तर हे पत्र वैयक्तिक पत्र आहे. एका केंद्रीय मंत्री महोदयांनी आपल्याच पक्षातील एका नेत्याला दिलेले हे वैयक्तिक पत्र आहे. हा शासन निर्णय नव्हे. त्यामुळे FRP चे तुकडे होणार नाहीत. अशा कितीही भूलथापा दिल्या तरी या सरकारच्या “पोटात एक आणि ओठात एक” आहे, हे आपल्याला तीन शेतकरीविरोधी कामे कायदे करताना दिसलेच आहे.

त्यामुळे हे लोक पाशवी बहुमताच्या जोरावर FRP च्या तुकडीकरणाच्या हा देखील कायदा संसदेत संमत करून कायदा बनवुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावतील म्हणुन जोवर प्रधानमंत्री अथवा वाणिज्यमंत्री संसदेत एकरकमी FRP कायदा अबाधित राहील असे सांगत नाहीत तोवर स्वाभिमानीचा आदरणीय राजु शेट्टीसाहेबांच्या नेतृत्वातील हा एकरकमी FRP साठीचा सुरू असलेला हा लढा सुरूच राहील. – रणजित बागल राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवाआघाडी

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article‘घार फिरते आकाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी’ अशी अवस्था माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांची आहे.
Next articleप्रांताधिकारी विजयकुमार देशमुख यांची अमरसिंह माने देशमुख व सतिश माने देशमुख यांनी घेतली भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here