थेट जनतेतील सरपंचाची ठेकेदाराने लायकी काढून थेट आई बहीण काढली

ग्रामपंचायतीचा कामाशी संबंध नसताना पैशाची मागणी करताना सरपंचाने पातळी सोडली, ठेकेदाराने आब्रुच काढली.

माळशिरस ( बारामती झटका )

केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा थेट निधी अथवा 14 वा किंवा 15 वा वित्त आयोगाचे निधी मधून रस्त्याचे काम नसताना थेट लोकनियुक्त जनतेतील सरपंच यांच्या ग्रामपंचायतीच्या कामाशी काहीही संबंध नसताना पैशाची मागणी करीत असताना सरपंचाने पातळी सोडली. एकेरी शब्दात अर्वाच्य भाषेत धमकी देत भाषा वापरल्याने थेट जनतेतील सरपंचाची ठेकेदाराने लायची काढून आई बहीण काढली.

जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात डीपीसीमधून मोठा निधी उपलब्ध होत असतो. लोकप्रतिनिधींनी गावाच्या अडचणीसाठी रस्ता मंजूर केलेला होता. सदर रस्त्याचे रितसर टेंडर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत झालेले होते. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्यामधील व्यवहार पूर्ण झालेला होता. रस्त्याचे काम मुख्य ठेकेदार याने सब ठेकेदार यांना खडीकरणाचे काम दिलेले होते. कारपेट व सीलकोट स्वतः करणार होते. खडीकरणाचे काम सुरू असताना लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच यांनी सब ठेकेदार यांना हॉटेलवर बोलावून घेऊन थेट पैशाची मागणी केली. मुख्य ठेकेदार यांना सदरच्या वेळी शिवीगाळ केलेली होती. सब ठेकेदार यांनी मुख्य ठेकेदार यांना घडलेली घटना सांगितलेली होती.

लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच वारंवार मुख्य ठेकेदार यांना फोन करीत होते. घाईगडबडीत फोन उचलला नव्हता. त्यांनी आपली मागणी त्यावर विचार केला जाईल, असा निरोप सरपंचांना दिलेला होता. तरीसुद्धा सरपंचाची फोन करण्याची घाई सुरू होती. शेवटी दुसऱ्याच्या नंबर वरून मुख्य ठेकेदार यांना सरपंच यांनी फोन केला. संभाषणाला सुरुवात झाली. सरपंचांनी ठेकेदाराला तुम्ही फोन उचलत नाही, दिलेला शब्द पाळला नाही. तु कामाच्या ठिकाणी गावात ये. तू कसा काम करतोय बघतू, असे म्हणत अर्वाच्य भाषा वापरली. सरपंचाची पातळी सुटली. त्यामुळे वैतागलेले ठेकेदार यांनी तुझा पैसे मागण्याचा संबंध काय ? तू गावचा सरपंच आहे, तुझी लायकी काय आहे कळली, पैसे मागायला भिकारी आहे का ? तुझ्या ग्रामपंचायतीचा आणि कामाचा काय संबंध आहे का ? पैसे मागण्यासाठी निवडून दिले का ? गावात येऊन दाखव म्हणतोस. तुझ्या काय बापाचं गाव आहे का, असे म्हणत ठेकेदार यांनी सरपंचाची आई बहीण काढलेली आहे. सरपंचाची अरेरावी व एकेरी भाषा यामुळे ठेकेदाराची सटकली.

दोघांमधील फोनवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. प्रसार माध्यम यांच्याकडे मिळालेल्या माहितीवरून विशेष म्हणजे मुख्य ठेकेदार आणि थेट जनतेतील सरपंच एकाच समाजाचे आहेत. कदाचित एकमेकांचे पाहुणे सुद्धा असू शकतात. मात्र पैशाचा देवाण-घेवाणीची शाब्दिक चकमक टोकाला पोचलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाळुंग सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर तर व्हा. चेअरमन हमीद वसान.
Next articleशिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी उद्योग व्यवसायात गतवैभव प्राप्त करणार, बाळसे धरण्यास सुरुवात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here