थेट जनतेतील सरपंच पदाच्या मतांवर उपसरपंच यांचे भवितव्य लागले टांगणीला

नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे वेगवेगळे निर्णय असल्याची चर्चा सुरू, सरपंचांना किती मताचा अधिकार राहणार याकडे लक्ष…

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतील सरपंच निर्णय रद्द केलेला पुन्हा सुरू करून सध्या थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. नागपूर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठाचे वेगवेगळे निर्णय असल्याने थेट जनतेतील सरपंच यांना किती मताचा अधिकार, यावर उपसरपंच पदाचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.

थेट जनतेतील सरपंच यांना उपसरपंच पदाच्या निवडीच्या वेळी मतदान ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबर करता येणार आहे आणि समसमान झाल्यानंतर निर्णायक मताचा देखील अधिकार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, नागपूर व औरंगाबाद खंडपीठाने दोन वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. एका खंडपीठाने सरपंच यांना निवड प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. समसमान झाल्यानंतर निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असा निर्णय आहे. तर दुसऱ्या खंडपीठाने उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मत देण्याचा अधिकार आहे. जर समसमान झाले तर, निर्णायक मत देण्याचा अधिकार म्हणजेच दोन मते देण्याचा अधिकार असा निर्णय न्यायालयाने दिलेला असल्याने दोन खंडपीठाचे वेगवेगळे निर्णय असल्याने निवडणूक प्रक्रिया नागपूर का औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर होणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

माळशिरस तालुक्यात थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी सरपंच निवडून आलेल्या विरोधी पार्टीत ग्रामपंचायत सदस्यांची संख्या जास्त आहे. अशा ग्रामपंचायतीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. जर थेट जनतेतील सरपंच यांना दोनदा मतदान करण्याचा अधिकार मिळाला तर विरोधी पार्टी उपसरपंच पदापासून दूर राहणार आहे. जर एकच मताचा निर्णय झाला तर विरोधी पार्टीला अनेक ठिकाणी उपसरपंच पदावर संधी मिळणार आहे. माळशिरस तालुक्यात 06,09,10 जानेवारी 2023 या तीन दिवशी उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळेवाडी अकलूज येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी
Next articleतळागाळातल्या लोकांची रत्नत्रय पतसंस्था : नितीन दोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here