नातेपुते (बारामती झटका)
मौजे नातेपुते येथे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मच्छिंद्रजी सकटे यांच्याहस्ते सचिन रणदिवे यांची दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. यावेळी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे, तालुका उपाध्यक्ष संपत खिलारे, संतोष लांडगे, रोहिदास लांडगे, रणवीर लांडगे, विकी अवघडे तसेच अधिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात तसेच पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांना दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदाची जबाबदारी दिलेले आहे. त्यांच्या या निवडीने त्याच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng