दहावी आणि बारावी आयुष्यातील टर्निंग पॉईंट – बाळासाहेब सरगर

माळशिरस (बारामती झटका)

इस्लामपूर येथे श्रद्धा कॉम्पुटर एज्युकेशनच्या वतीने ग्रामीण भागातील इ. १० वी १२ वी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सन्मान कार्यक्रम येथील सिद्धनाथ सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. सदर कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा इस्लामपूरचे व्यवस्थापक एस. डी. चव्हाण, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक धनंजय देशमुख, महिला व बालकल्याण समिती सदस्य अकबर शिकलगार, केंद्रसंचालक आनंद शेंडगे, संचालिका ताई शेंडगे, व्यवस्थापक प्रथमेश महामुनी, बबलू शिकलगार, रियाज शिकलगार, ताहेर शिकलगार व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब सरगर म्हणाले, दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शैक्षणिक संधी पसंत करण्याची वेळ असते. अशा वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पुढं भविष्यात शिक्षण घेण्यासाठी असणाऱ्या वाटा याचं ज्ञान नसते, हे ज्ञान देण्याचे काम श्रद्धा कॉम्प्युटरने यांनी केले, हे फार कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागामध्ये अशा मार्गदर्शन शिबीराची गरज आहे, ही गरज ओळखून हे काम आनंद शेंडगे सर यांनी केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. यावेळी शाखाधिकारी इस्लामपूर एस. डी. चव्हाण साहेब, धनंजय देशमुख, अकबर शिकलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थांना इ. १० वी व १२ वी नंतर पुढे शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. जर विद्यार्थांना हे मार्गदर्शन वेळेत मिळाले तर त्यांच्या पुढील शैक्षणीक प्रगतीस याचा फायदा होतो. व अंतिम ध्येय गाठण्यासाठी मदत होते. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थांना याबाबत माहिती मिळावी याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

विद्यार्थांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शासकीय, निमशासकीय नौकरी, स्पर्धात्मक परीक्षेची तयार आणि विविध प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्राबाबत विद्यार्थाना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन व माहिती दिली. या कार्यक्रमाचा परिसरातील विद्यार्थांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद शेंडगे यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन लोकराज्य दिन म्हणून साजरा
Next articleभारुड सम्राट ह.भ.प. ब्रह्मदेव केंगार महाराज “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here