दहिगाव जिल्हा परिषद गटातील डोंबाळवाडी व हनुमानवाडी जिल्हा परिषद फोंडशिरस गटात घेण्यात यावी, ॲड. प्रशांत रुपनवर यांची मागणी.

जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण रचनेत फेरबदल करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे रीतसर हरकत दाखल.

माळशिरस ( बारामती झटका )

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांची गट व गण रचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये कोणाची काही हरकत असल्यास दि. 8 जून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय यांनी हरकती मागवलेल्या होत्या. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट फोंडशिरस यामध्ये दहीगाव गटामध्ये समाविष्ट असणारी डोंबाळवाडी व हनुमानवाडी ही गावे पंचायत समिती गण पिरळे व फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये समाविष्ट करावी, असे राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व युवा नेते ॲड. प्रशांत रुपनवर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकत घेऊन रितसर पत्रव्यवहार केलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. 15 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन पुणे येथे सदर हरकतीवर सुनावणी होणार आहे, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ॲड. प्रशांत रुपनवर यांनी दिलेल्या हरकतीमध्ये ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद गट फोंडशिरस व पंचायत समिती गण हे गण असून सदर पिरळे गणामध्ये कुरबावी, एकशिव, तांबेवाडी, पिरळे, कळंबोली, बांगर्डे, पळसमंडळ असा बनला असून फोंडशिरस जिल्हा परिषद गटात कुरबावी, एकशिव, तांबेवाडी, पिरळे, कळंबोली, बांगर्डे, पळसमंडळ, फोंडशिरस, मोटेवाडी, तामशिदवाडी, मारकडवाडी, कदमवाडी असा आहे. पिरळे या गणात नजीक असणारे डोंबाळवाडी व हनुमानवाडी ही गावे नैसर्गिक सीमा, ओढा तसेच पोस्ट ऑफिस व दळणवळणाचा विचार करता व लोकप्रतिनिधींना प्रवासासाठी सोयीस्कर असण्यासाठी पिरळे या पंचायत समिती गण अशी व फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये असणे विकासाच्या दृष्टीने व भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टीने आणि दळणवळणाच्या दृष्टीने समाविष्ट होणे गरजेचे आहे. सध्या दहीगाव जिल्हापरिषद गटामध्ये व धर्मपुरी पंचायत समिती गणामध्ये आहेत. या संपूर्ण गोष्टीचा विचार करून सदरचे डोंबाळवाडी व हनुमानवाडी ही गावे पंचायत गण जिल्हा परिषद यामध्ये समाविष्ट होणे न्यायाच्या दृष्टीने आहे. तरी मौजे डोंबाळवाडी व हनुमानवाडी ही गावे पंचायत व जिल्हा परिषद यांच्यामध्ये समाविष्ट व्हावी, अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दाखल केलेली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन पुणे येथे सदर हरकतींवर सुनावणी होणार असल्याचे कळविले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपिंपरी येथे कृषि विभागाची संयुक्त मोहीम संपन्न…
Next article‘How to Mine Litecoin and How LTC Mining Works’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here