भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार.
दहिगाव ( बारामती झटका)
दहिगाव ता. माळशिरस येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सवानिमित्त सामाजिक प्रबोधनकार सुरेश पवार, मंगळवेढा यांच्या व्याख्यानाचे आयोजन सोमवार दि. ११/०४/२०२२ रोजी सायंकाळी ६ वा. शिवाजी चौक, दहिगाव, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते आणि माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील हे असणार आहेत.

सदरचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त दशरथ सदाशिव फुले, नातेपुतेचे नगरसेवक ॲड. भानुदास राऊत, जिल्हा परिषद सदस्या सौ. ऋतुजा शरद मोरे, दहीगावचे सरपंच ॲड. रणधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ जास्तीत जास्त श्रोत्यांनी घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
