दहिगाव येथे श्री. मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप

दहिगाव (बारामती झटका)

दहिगाव ता. माळशिरस येथे श्री. मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त साठे नगर, दहिगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना मदत फाउंडेशन दहिगाव यांच्यावतीने हार, फेटा, केक या सर्वांवर खर्च न करता त्या पैशातुन साठेनगर येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी मदत फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. केतन यादव यांच्या संकल्पनेतून हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दहिगाव, साठे नगर येथील मदत फाउंडेशनचे माजी सैनिक अशोक दणाणे, अंकुश खिलारे, विशाल खिलारे, राहुल खिलारे, अशोक खिलारे, गौतम खिलारे, त्रिंबक पवार, महिला सदस्य मंगल दणाणे, जगुबाई खिलारे, कोमल खिलारे, साक्षी साठे, शीला दणाणे आदि महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या उपक्रमाचे दहीगाव परिसरातून कौतुक होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिद्द, चिकाटी व मेहनतीवर आई-वडिलांच्या आशीर्वादाने दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवला.
Next articleचि. हनुमंत सरगर, गिरवी आणि चि.सौ.कां. प्रतीक्षा ढवळे, धुळदेव यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here