दहिवडीमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

दहिवडी (बारामती झटका एकनाथ वाघमोडे यांजकडून)


विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल, पण माण तालुक्यात आपल्या मालाला भाव नाही म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल.
दहिवडीजवळील गणेशशेरी येथील शेतकरी शशिकांत हंबिरे, (वय ५५ वर्ष) यांनी जवळ असलेल्या कापडी लुंगीच्या साहाय्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मृत शेतकरी शशिकांत हंबीरे यांच्या मुलाच्या बाळासाहेब हंबीरे निदर्शनास आल्यानंतर (वय २५ वर्षे) यांनी लगेच आपल्या अजून दोन भावांना बोलवून घेत वडिलांना झाडावरून लटकलेल्या अवस्थेत खाली घेत उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी सदर व्यक्ती मृत झाल्याचे घोषीत केले.


सदर घटनेनंतर याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली. मृत शेतकऱ्याच्या मुलाने बाळासाहेब हंबीरे यांनी कांद्याचे हवे तेवढे उत्पादन न निघाल्याने व पिकाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने ते तणावात होते यातूनच निराश होऊन वडिलांनी आत्महत्या केल्याचे व उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे निदर्शनास आल्याचे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या जबाबात सांगितले. सदर घटनेचा अधिक तपास स.पो.नि. संतोष तासगावकर व त्यांची टीम करत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोरडवाडीच्या सरपंच पदी विष्णूभाऊ गोरड यांची बिनविरोध निवड
Next articleदुधामध्ये भेसळ करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here