विद्यमान चेअरमन रामभाऊ पाटील गटाची सत्ता अबाधित, सरपंच ॲड. रणधिर पाटील विजयाचे किंग मेकर.
विरोधकांचा पाचशे मतांच्या फरकाने धुरळा…
दहिगाव ( बारामती झटका )
दहिगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे. विद्यमान चेअरमन राजाभाऊ पाटील गटाची सत्ता अबाधित राहिलेली आहे. विद्यमान सरपंच ॲड. रणधीर पाटील विजयाचे किंग मेकर ठरले आहेत. विरोधकांचा 500 मतांच्या फरकाने धुरळा उडवून दिलेला आहे.
दहिगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे चार उमेदवार बिनविरोध झालेले होते. तर सर्वसाधारण कर्जदार गटामध्ये आठ जागांसाठी दहा उमेदवार उभे होते. चिकणे आनंत नारायण 760, जाधव मोहन दिनकर 763, कदम दीपक दादा 725, किर्दक महेश गजानन 759, मोरे पोपट दादू 241, निकम सर्जेराव गुलाब 768, पाटील रामचंद्र दशरथ 749, फुले विनायक मोहन 715, सावंत बाळासो पोपट 760, सावंत शशिकांत गुलाब 228 अशी मते पडलेली आहेत. तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात चव्हाण चंद्रकांत शिवराम 212, चौगुले ज्ञानदेव गणपत 701 अशी मते पडलेली आहेत. सत्ताधारी गटाला जास्तीत-जास्त 768 तर विरोधी गटाला 228 मते पडलेली आहेत. 540 मतांच्या फरकाने मतदारांनी विरोधकांचा धोबीपछाड केलेला आहे.

दहिगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे गेली 35 वर्ष रामभाऊ पाटील चेअरमनपदाची यशस्वी धुरा सांभाळत आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल अडीच कोटींच्या आसपास आहे. दरवर्षी सभासदांना बोनस वाटप केला जातो. संस्थेची स्वतःची भव्य अशी इमारत आहे. सदर संस्थेचा कारभार सभासदांचे हित व पारदर्शकपणे संस्थेचे सचिव मदनराज पाटील पाहत आहेत. विरोधी गटाने नाद केला पण वाया गेला, अशी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng