दादासाहेब वाघमोडे गटाच्या मनाच्या मोठेपणा मुळे भांबुर्डी गावच्या सरपंच पदाची संधी – महादेव वाघमोडे

भांबुर्डीच्या नूतन सरपंच लक्ष्मी महादेव वाघमोडे यांचा मावळते सरपंच स्वातीताई दादासाहेब वाघमोडे यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

भांबुर्डी ( बारामती झटका )

भांबुर्डी तालुका माळशिरस येथील सरपंच पदाच्या निवडीबाबत गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संजयआण्णा मोटे यांचे निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली सदरच्या बैठकीस ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे, ग्रामपंचायत चे मार्गदर्शक दादासाहेब वाघमोडे, रवी तात्या मोटे, बळवंत वाघमोडे ,ज्ञानदेव वाघमोडे, संजय बंडगर, सतिश तिकोटे अशोक वाघमोडे आप्पासो वाघमोडे, शंकर वाघमोडे, बबन वाघमोडे. अशा नेतेमंडळींची बैठक संपन्न झाली यामध्ये सौ लक्ष्मी महादेव वाघमोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला होता त्यावेळेस महादेव वाघमोडे यांनी दादासाहेब वाघमोडे गटाच्या मनाच्या मोठेपणा मुळे भांबुर्डी गावच्या सरपंचपदी विराजमान होण्याची सुवर्णसंधी मिळालेली असल्याची भावना बोलून दाखवली.
भांबुर्डी ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते गणपत तात्या वाघमोडे व दादासाहेब वाघमोडे दोन्ही राजकीय गट एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. दोन्ही गटांना सत्तेत वाटा देण्याकरिता अडीच अडीच वर्षे सरपंच पदाचा कार्यकाल ठरलेला होता पहिल्यांदा थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ स्वाती ताई दादासाहेब वाघमोडे उभ्या राहिलेल्या होत्या भरघोस मतांनी निवडून आलेल्या होत्या त्यांनी त्यांच्या कार्य कालामध्ये अनेक विकासाची कामे केलेली आहे त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर ठरलेल्या वेळी सरपंच पदाचा राजीनामा दिला. गणपत तात्या वाघमोडे गटातील सरपंच पदाच्या दावेदार असणाऱ्या सौ रुक्मिणी मारुती वाघमोडे यांना संधी दिली जाणार होती. नाव विकास आघाडी सरकारने थेट जनतेतील सरपंच रद्द केलेले असल्याने रुक्मिणी वाघमोडे यांना सदस्य होणे गरजेचे होते प्रभाग क्रमांक पाच मध्ये विष्णू वाघमोडे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिलेला होता रिक्त झालेल्या सदस्यपदी रुक्मिणी वाघमोडे निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे भांबुर्डी गावच्या राजकारणाला वेगळी दिशा निर्माण झाली. गणपतराव वाघमोडे गटातील ज्यांना सरपंच पदाचा शब्द दिलेला होता त्या उमेदवाराचा पराभव झाला तरीसुद्धा दादासाहेब वाघमोडे गटाची बैठक होऊन मनाचा मोठेपणा दाखवून सदरच्या बैठकीमध्ये गणपतराव वाघमोडे गटातील लक्ष्मी महादेव वाघमोडे यांना संधी दिली. सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी एकमेव सरपंच पदासाठी अर्ज लक्ष्‍मी महादेव वाघमोडे यांचा आलेला होता त्यावेळेस त्यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ स्वातीताई दादासाहेब वाघमोडे यांनी नूतन सरपंच यांचा सन्मान करून भांबुर्डी गावच्या सरपंच पदाचा पदभार दिला.
लक्ष्मी महादेव वाघमोडे, पडलेल्या रुक्मिणी मारुती वाघमोडे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचिरंजीव अरुण मगर पाटील आणि चि.सौ.का. मेघा जाधव यांचा शाहीविवाह सोहळा संपन्न झाला.
Next articleएल. आय. सी. क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा एम.डी.आर.टी. 2022 चा पुरस्कार श्री. परमेश्वर ननवरे यांना जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here