सोलापूर जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्ण १७२ तर माळशिरस तालुक्यात १३ रुग्ण
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना परिस्थिती अत्यंत दिलासादायक झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ १७२ सक्रिय रूग्ण आहेत त्यापैकी माळशिरस तालुक्यात १३ रुग्ण सक्रिय आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट ८, बार्शी १९, करमाळा १३, माढा १३, मंगळवेढा १२, मोहोळ १७, उत्तर सोलापूर ६, पंढरपूर ३७, सांगोला ३१, दक्षिण सोलापूर ३ अशी कोरोना रुग्णांची संख्या आहे.
कोरोना संसर्ग रोगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. तिसरी लाट विध्वंसक येईल, असे बोलले जात होते. मात्र तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. त्यामुळे शासनाचे निर्बंध कमी होत जाऊन सर्वसामान्य जनता पुन्हा मोकळा श्वास घेत आहे. जनतेला मोठा दिलासा मिळालेला आहे.
माळशिरस तालुक्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली १२ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे कार्यरत आहेत. उपजिल्हा रुग्णालय अकलूज, ग्रामीण रुग्णालय माळशिरस, नातेपुते मधील सर्व डॉक्टर्स कर्मचारी यांच्यासोबत स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता व साफसफाई कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी सर्वसामान्य जनतेला कोरोनापासून मुक्ती मिळावी यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. लवकरच माळशिरस तालुका कोरोनामुक्त होईल. सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी केलेल्या कार्याचे बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलच्या वतीने धन्यवाद देऊन त्यांनी केलेल्या कार्य कौतुकाचा कायम अभिमान राहील.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng