दिसेल तिथे किरीट सोमय्यांचे थोबाड रंगवणार – मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांचा इशारा

करमाळा (बारामती झटका)

महाराष्ट्रातल्या तमाम तरुण-तरुणींच्या हृदयस्थानी असलेले मराठा आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याबद्दल आपण जे आरोप करत आहात ही राजकारणाची अतिशय खालची पातळी म्हणावे लागेल. आत्तापर्यंत आपण राजकीय मंडळीबद्दल बोलत होतात, तोपर्यंत ठीक होतं. आज आपण प्रशासकीय अधिकाऱ्यावर असे बेछूट आरोप करून तुमची व तुमच्या पक्षाची सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे आपण सिद्ध केले आहे.
भाजपचे किरीट सोमय्या जिथे असतील तिथे त्यांचे थोबाड रंगवणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांनी दिला आहे. जो अधिकारी जिवाची पर्वा न करता मुंबई हल्ल्यामध्ये राष्ट्राच्या संरक्षणासाठी अतिरेक्यांविरुद्ध लढला कमीत कमी याची तरी जाण ठेवायला हवी होती.
याच अधिकाऱ्याला तुमच्या सत्तेच्या काळात तुमच्या सरकारने उत्कृष्ट पोलीस अधिकाऱ्यांची पदके दिली आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही घोटाळे झाले निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी पण असे करत असताना निस्पृह, निस्वार्थी, कर्तव्यदक्ष, अतुलनीय देशसेवा केलेल्या मराठा अधिकाऱ्याला आपण बदनाम करून मराठी व मराठा यांची देशभर बदनामी करत आहात ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
ज्या अधिकाऱ्याला बघून या देशातील युवक व युवती प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी धडपडत असतात, अशा अधिकाऱ्याला बदनाम करून आपण देशद्रोहाचा गुन्हा करीत आहात असा आमचा आरोप आहे.
सतत देशभक्तीचे धडे देणाऱ्याला अशी कृती शोभत नाही. आपल्या कृतीचा मराठा क्रांती ठोक मोर्चा तीव्र शब्दात धिक्कार करीत असून सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती येथे संजय गांधी निराधार योजनेची 207 प्रकरणे मंजूर
Next articleराग, लोभ, द्वेष आणि अहंकार सोडून समाधानी आयुष्य जगण्याची गरज – ह.भ.प. अमोल महाराज सुळ सर मोरोची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here