माळीनगर( बारामती झटका )
येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगर संचलित प्राथमिक शाळा क्रमांक दोन (पांढरे वस्ती) येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या शाळेच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले.
संस्थेचे सभासद समीर अरुणराव पांढरे यांच्याहस्ते तर संस्थेचे चेअरमन नंदकुमार गिरमे, व्हा. चेअरमन अजय गिरमे, सेक्रेटरी ॲड. सच्चीदानंद बधे, खजिनदार सुरेश राऊत, संचालक अनिल रासकर, रत्नदीप बोरावके, डॉ. अविनाश जाधव, कल्पेश पांढरे, पंकज गिरमे व संचालिका निशाताई पांढरे, सभासद राजीव नवले, विनय नवले व रितेश पांढरे सर यांच्या उपस्थितीत सदरचा भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

स्वातंत्रपूर्व काळात १९३३ साली या शाळेची स्थापना झाली आहे. या शाळेची इमारत जीर्ण झाल्याने या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्याच्या दृष्टीने संस्थेच्या संचालक मंडळाने नवीन शाळा बांधण्याचा निर्णय घेतला.
या कार्यक्रमास बांधकाम ठेकेदार विनीत बोरावके, इंजिनिअर विश्वजित एकतपुरे, मुख्याध्यापक प्रदीप कांबळे, शिक्षक निलेश बुगडे, निलेश साळुंखे, लिपिक स्वप्नील नागटीळक, गनी शेख आदी यावेळी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng