साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे राज्य अध्यक्ष हर्षदभाऊ भोसले यांची निवेदनातून मागणी.
अकलूज ( बारामती झटका )
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर ता. माळशिरस या साखर कारखान्यातील शेती विभागातील क्लार्क व प्रायव्हेट फंड काम पाहणारे श्री. गणेश टिळेकर यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी, असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे राज्य अध्यक्ष हर्षदभाऊ भोसले यांनी साखर संकुल पुणे येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिलेले आहे.
सदरच्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या कारखान्यात शेती विभागांमध्ये कार्यरत असणारे गणेश टिळेकर सध्या त्यांच्याकडे कामगारांचा प्रायव्हेट फंड व इतर कामगारांच्या कामकाजाचे काम त्यांच्याकडे आहे. सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याशी उद्धट वर्तन करून वेळेमध्ये काम केले जात नाही. कामगारांकडून पैशांची मागणी करून वेठीस धरले जात आहे. अर्वाच्य भाषा वापरून कामगार व नातेवाईक यांचे खच्चीकरण केले जात आहे. कितीतरी कामगार प्रायव्हेट फंडापासून वंचित आहेत. अनेक लोकांच्या अशा तक्रारी आहेत की, त्यांच्याकडे असणाऱ्या टेबलच्या कामकाजाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करून निलंबनाची कारवाई करावी. वेळेचे व कामगारांचे भवितव्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील या निवेदनामध्ये देण्यात आला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng