माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 82 लाख 72 हजार 605 रुपये विशेष प्रयत्नातून केले मंजूर.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस फक्त नावालाच विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र, विकासाला सत्ताधारी नेत्यांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी राजकीय गुरु असणारे विरोधी पक्ष देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांना फोन करून माळशिरस तालुक्यातील वंचित गावांना बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते यांनी ना. शंकरराव गडाख यांना फोन करून रामाच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी पाण्याची अडचण आहे, त्वरित बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करावा असा फोन झाला. आणि जलसंधारण विभागाने माळशिरस तालुक्यातील गावांसाठी 5 कोटी 82 लाख 72 हजार 605 एवढा निधी मंजूर केलेला आहे. मंजूरच नाही तर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
महाराष्ट्र जलसंधारण मंडळ औरंगाबाद व्यवस्थापकीय संचालक सु.पा. कुशिरे यांनी आठ गावासाठी 11 बंधारे मंजूर केलेले लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना प्रशासकीय मंजुरीचे पत्र पाठवलेले आहे. त्यामध्ये भांबुर्डी क्रमांक 1 साठी 77 लाख 93 हजार 653 रुपये, भांबुर्डी क्रमांक 2 साठी 64 लाख 67 हजार 706 रुपये, दहिगाव क्रमांक 1 साठी 52 लाख अठरा हजार 728 रुपये, दहिगाव क्रमांक दोन 2 मराठी 57 लाख 84 हजार 147 रुपये, निमगाव क्रमांक 1 (स्मशानभूमीजवळ) 73 लाख 96 हजार 646 रुपये पुरंदावडे 62 लाख 03 हजार 531 रुपये, मोटेवाडी (नाना मोटे) 20 लाख 95 हजार 377 रुपये, तामसिदवाडी 58 लाख 52 हजार 314 रुपये, मांडवे (लवटे शेत) 43 लाख 43 हजार 52 रुपये, तामसिदवाडी 49 लाख 80 हजार 378 रुपये, मंजूर केलेले आहे.

जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते राम सातपुते यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याची अडचण आ. राम सातपुते यांनी दूर केली आहे.
कायम सर्वसामान्य शेतकरी, दबलेल्या, पिचलेल्या लोकांसाठी कार्य करून तालुक्यात राम राज्य निर्माण करणारे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तालुक्याचे ज्येष्ठ नेते गणपत तात्या वाघमोडे आणि भांबुर्डीचे माजी सरपंच देवा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भांबुर्डी गावांमध्ये राम सातपुते यांच्या आई-वडिलांनी ऊस तोड मजूर म्हणून काम करून उदरनिर्वाह केला. त्याच भांबुर्डी गावांमधील मतदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवून तालुक्याचे लोकप्रतिनिधी झालेले आहेत. तालुक्याला निधीचे वाटप करीत असताना वाढपी आमच्या गावचा असल्याने आमच्या गावाला 1 कोटी 42 लाख 61 हजार 659 रुपयाचा निधी मंजूर केलेला असल्याने भांबुर्डी करांमधून आमदार राम सातपुते यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng