देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे वर्च्युअल उद्घाटन

ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम


पुणे (बारामती झटका)

ग्रॅव्हिटी फाउंडेशनने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन केले. बाल्हेगावच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे औरंगाबाद येथे भूमिपूजनाने सुरुवात केली. यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री / महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते), उज्वल निकम (भारतीय विशेष सरकारी वकील) आणि ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष मीहीर कुलकर्णी यांनी देशाच्या विविध भागातून या व्हर्च्युअल उद्घाटनाला हजेरी लावली. देशातील साथीच्या आजाराची परिस्थिती लक्षात घेऊन ग्रॅव्हिटी फाउंडेशनने व्हर्च्युअल प्रक्षेपण केले जे यशस्वीरीत्या पार पडले.

 बाल्हेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. ग्रॅव्हिटी फाउंडेशनने गावात सुधारणा व गावाचा विकास करण्याच्या उद्येश्यातुन या गावास दत्तक घेतले आहे. सिंचन, रस्ता बांधकाम, ग्रंथालय, जिम, जलशुद्धीकरण, आणि पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छता सुविधा व इतर काही गोष्टी या विकास प्रक्रियेचा भाग आहेत.

याप्रसंगी माननीय देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना म्हणाले, बाल्हेगावच्या विकासासाठी ग्रॅव्हिटी ग्रुपचा पुढाकार हा समाजाच्या कल्याणासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मी मीहीर  कुलकर्णींचे कौतुक करतो. समाज्याचे देणे परत करण्यासाठी विकास उपक्रम राबविण्याची ही सर्वात प्रभावी पद्धती आहे. बाल्हेगावच्या सुधारणेमध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे, त्यापैकी एक म्हणजे आरोग्यसेवा सुधारणे, जी की देशातील आजच्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महत्त्वपूर्ण आहे. आणि मला विश्वास आहे की हा प्रकल्प बाल्हेगाव गावातील रहिवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.


पुढे ते म्हणाले, मी या प्रकल्पाला मनापासून पाठिंबा देतो आणि भविष्यात यासाठी आवश्यक ती मदत देणे हा माझा प्रयत्न राहील. हा एक अद्भुत प्रकल्प आहे आणि मला विश्वास आहे की आपण सर्वजण मिळून ते यशस्वी करण्यासाठी काम करू.

उज्वल निकम (भारतीय विशेष सरकारी वकील) यांनी ग्रॅ्व्हिटी ग्रुपला शुभेच्छा दिल्या आणि बाल्हेगाव विकास योजनेच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. त्यांनी विकासकामांवर नियमितपणे देखरेख ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्रगतीमध्ये अडथळा आणण्यार्या वाईट हेतूच्या व्यक्तींना दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर ग्रॅव्हिटी फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आणि सामाजिक कार्यासाठी ग्रॅव्हिटी फाउंडेशनला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. बाल्हेगाव गावाच्या विकासाव्यतिरिक्त, ग्रॅव्हिटी फाउंडेशन नैसर्गिक आपत्ती, गरीबांचा विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण करताना मदत करण्याचे कार्य करते.

बाल्हेगाव विकास योजना सुरू करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. १४०० लोकसंख्या असलेल्या या गावाचा विकास हे समाज सुधारण्यासाठी आमचे छोटे योगदान आहे, असे मीहीर कुलकर्णी (अध्यक्ष, ग्रॅव्हिटी ग्रुप) म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, माझे पूर्वज आणि कुटुंब हे बाल्हेगाव गावातील आहेत, म्हणून विकास कार्याचा हा प्रयत्न माझ्या हृदयाच्या खुप जवळ आहे. बाल्हेगावमधील प्रत्येक कुटुंबाला त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि निरोगी वातावरणात राहण्यासाठी उत्तम सुविधा मिळाव्यात ही हमी देण्यासाठी मी विकास कार्य करत राहीन. ”

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्त्रियांनी आता सावित्रीबाईंप्रमाणे रणरागिणी व्हावे – ॲड. रवींद्र पवार
Next articleभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती नगरपरिषदेत कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here