देशमुखपट्टा विकास सेवा सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाची बिनविरोध परंपरा कायम राखली.
माळशिरस (बारामती झटका )
देशमुखपट्टा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कचरेवाडी माळशिरस या सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन संचालक मंडळाची स्थापनेपासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखलेली आहे. पदाच्या निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध संचालक मंडळाची चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी गुरुवार दि. 19/05/2022 रोजी संचालक मंडळाची सभा पार पडली. यावेळी सोसायटीचे
चेअरमन पदासाठी सचिन (तात्या) देशमुख तर व्हा. चेअरमन पदासाठी सौ. जनाबाई शिवाजी देशमुख यांचे एकमेव अर्ज आलेले असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी बिनविरोध निवड झालेली घोषणा केली.
यावेळी नुतन संचालक तुकाराम नारायण सर्जे, नवनाथ हनुमंत देशमुख, महादेव बाबा शिंदे, माणिक गणपत पाटील, श्रीमंत महादेव देशमुख, बाबा सोपान दनाने, बाजीराव माधव सर्जे, नवनाथ रामचंद्र कचरे, हरिश्चंद्र मारुती कोळेकर, सत्यभामा विष्णू गोरे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी जाधव साहेब यांना विकास सेवा संस्थेचे सचिव मधुकर वाघमोडे यांनी सहकार्य केले.
चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी दरम्यान माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख, नगरसेवक वस्ताद विजय देशमुख, ज्येष्ठ गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, पंढरी सर्जे, सुरेश लवटे, विष्णुपंत टेळे, आगतराव देशमुख, प्रकाश टेळे, सदाशिव देशमुख, दत्तात्रय देशमुख, बंटी उर्फ रोहित लवटे, बाजीनाना सर्जे, योगेश देशमुख, टि. डी. देशमुख, रविराज खुसपे, पप्पू देशमुख, हरी देशमुख, धुळदेव देशमुख, विजय हनुमंत देशमुख, सुनील देशमुख यांच्यासह संस्थेचे क्लार्क तानाजी किसन देशमुख, सुनिल सर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.
विकास सेवा सोसायटीची स्थापना झाल्यापासून बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. संस्थेचे 650 सभासद आहेत. एक कोटी रुपयाच्या आसपास वाटप करण्यात येत असून शंभर टक्के वसुली केली जाते. सभासदांना लाभांश वाटला जातो. संस्थेला स्वतःची जागा व भव्य इमारत आहे. 50 लाख रुपये भागभांडवल आहे. संस्थेचे सचिव मधुकर वाघमोडे भाऊसाहेब सभासदांचे हित जोपासुन संस्थेचा कारभार पारदर्शकपणे व काटकसरीने केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng