चि. रणजित देशमुख व चि.सौ.कां. प्राजक्ता टेळे, चि. प्रतीक देशमुख व चि.सौ.कां. कोमल, चि. हनुमंत देशमुख व चि.सौ.कां. काजल जेडगे यांचा शुभविवाह मंगल सोहळा संपन्न होणार.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील सौ. सुमन व श्री एकनाथ गोपाळ देशमुख यांचे चिरंजीव रणजीत व माळशिरस येथील सौ. द्रोपदी व श्री. दत्तात्रय भगवान टेळे यांची कन्या चि.सौ.कां. प्राजक्ता, माळशिरस येथील सौ. सीता व श्री. निवृत्ती गोपाळ देशमुख यांचे चिरंजीव प्रतीक व कचरेवाडी येथील सौ. सुमन व श्री. बाळू पंढरीनाथ जानकर यांची कन्या चि.सौ.कां. कोमल, माळशिरस येथील सौ. आशा व श्री. पांडुरंग गोपाळ देशमुख यांचे चिरंजीव हनुमंत व माळशिरस येथील सौ. संगीता व श्री. मारुती भागोजी जेडगे यांची कन्या चि.सौ.कां. काजल यांचा शुभविवाह सोमवार दि. 25/04/2022 रोजी 12 वा. 38 मिनिटांनी अक्षता मंगल कार्यालय माळशिरस, अकलूज रोड, 61 फाटा या ठिकाणी संपन्न होणार आहे.
देशमुख-टेळे, देशमुख-जानकर, देशमुख-जेडगे, शाही विवाह सोहळ्याचे तुकारामभाऊ रामचंद्र देशमुख, महादेवतात्या गोपाळ देशमुख, अशोकदादा बापूराव देशमुख प्रेषक आहेत. सदर शुभविवाहाचे आमंत्रण निमंत्रण आपणांस हस्ते परहस्ते दिलेले आहे. नजर चुकीने मित्रपरिवार, नातेवाईक निमंत्रणाचे कोणी राहिले असतील तर हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन निमंत्रक माळशिरस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पांडुरंगतात्या गोपाळ देशमुख आणि समस्त देशमुख परिवार माळशिरस यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng