इस्लामपूर ( बारामती झटका )
इस्लामपूर ता. माळशिरस गावचे माजी पोलीस पाटील तुकाराम शंकरराव देशमुख, यांचे चिरंजीव गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर युवराज तुकाराम देशमुख यांनी नव्याने बांधलेल्या “स्वप्नपूर्ती” या वास्तूचा वास्तुशांती, गृहप्रवेश व सत्यनारायण पूजा समारंभाचे आयोजन शुक्रवार दि. 31/12/2021 रोजी सकाळी 11 वा. करण्याचे योजिले आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे देशमुख परिवाराच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
इस्लामपूर गावचे प्रगतशील बागायतदार व माजी पोलीस पाटील तुकाराम शंकरराव देशमुख व सौ. सुरेखा देशमुख यांना युवराज व रविराज अशी दोन मुले आहेत. पोलीस पाटील यांचा गावामध्ये जुन्या पद्धतीचा वाडा आहे. त्या ठिकाणी गाव गाड्याचा न्यायनिवाडा केला जात असे. युवराज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत तर रविराज शेती करीत आहेत. रविराज यांनी घराचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. युवराज यांनीही आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरता स्वप्नपूर्ती बंगला बांधलेला आहे. देशमुख परिवार यांचे समाजामध्ये आदरातिथ्य वागणे, सुसंस्कृत सभाव यामुळे सर्व इस्लामपूर पंचक्रोशीसह तालुक्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
“स्वप्नपूर्ती” या वास्तूच्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, याकरता आग्रहाचे निमंत्रण आहे. स्नेहभोजन दु. दोन वाजल्यापासून ते आपल्या आगमनापर्यंत राहणार आहे. तरी इष्टमित्र आणि नातेवाईक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सौ. सुरेखा व श्री. तुकाराम शंकरराव देशमुख, सौ. सुषमा व श्री. युवराज तुकाराम देशमुख, सौ. साधना व श्री. रविराज तुकाराम देशमुख यांच्यावतीने करण्यात येत आहे. नजरचुकीने घाईगडबडीत निमंत्रण पत्रिका न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, अशी देशमुख परिवार यांच्याकडून विनंती आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng