देशाचे नेते,पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निरवांगी येथील श्री नंदिकेश्वर मंदिरात महायज्ञ संपन्न

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आदरणीय साहेबांच्या आरोग्यदायी दिर्घायुष्यासाठी निरवांगी येथील प्रसिद्ध श्री नंदिकेश्वरास श्री. नवनाथ रूपनवर व सौ. स्नेहा नवनाथ रूपनवर या उभयतांच्या शुभहस्ते दुग्धाभिषेक करून महायज्ञाचे पठण करण्यात आले. आजच्या या विशेष कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आदरणीय साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून दिर्घायुष्याच्या शब्दसुमनांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील यांनी बोलताना सांगितले की, देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब हे ख-या अर्थाने महाराष्ट्राचे आधारवड असुन जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकटे आली तेव्हा तेव्हा सामान्य माणसांच्या संकटात धावून जाणारा एकमेव लोकनेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री पदासह देशातील अनेक महत्त्वपूर्ण पदे आदरणीय साहेबांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. आत्ता तमाम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की, 2024 झाली आपल्या सर्वांना देशाचे पंतप्रधान म्हणून साहेबांना पाहायचं आहे. यामुळेच आज या महायज्ञाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीतभैय्या रणवरे-पाटलांनी सांगितले की, पवार साहेबांचा आजचा हा सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने भाग्याचा दिवस असून गेल्या पन्नास वर्षापासून अविरत कार्य करणाऱ्या सह्याद्री एवढ्या उंचीच्या आदरणीय पवार साहेबांचे आपण कार्यकर्ते आहोत, याचा निश्चितपणे गर्व आपल्या सर्वांना असून उभा महाराष्ट्र परिपाठ असलेला या राज्याच्या इतिहासामधील एकमेव लोकनेता म्हणजे आदरणीय साहेब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे सर यांनी प्रास्ताविक केले, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विरसिंहभैय्या रणसिंग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, पंचायत समितीचे सदस्य सतिश भाऊ पांढरे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापूरे, भटक्या विमुक्त जाती- जमाती सेलचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे, अपंग सेल तालुकाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दत्ता बाबर, दगडवाडीचे माजी सरपंच पिंगळे भाऊसाहेब, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड. नितीन कदम आदी मान्यवरांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमास बावडा‌ गावचे युवानेते संग्रामसिंह पाटील, निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय रणवरे-पाटील, राष्ट्रवादी युवतीच्या तालुकाध्यक्ष अश्विनी कुर्डे, राष्ट्रवादी पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, युवा नेते संजय भाऊ चव्हाण, राष्ट्रवादीचे माजी तालुका उपाध्यक्ष बबन रासकर, तालुका सरचिटणीस सुभाष डरंगे पवार, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विकास रासकर, अभिजीत रूपनवर, घोरपडवाडीचे सरपंच राजेंद्र चांगणे, दगडवाडीचे सरपंच आप्पा पारेकर, उपसरपंच रामदास रासकर, निरवांगी गावचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल पवार, समिर पोळ, दादा सुळ, शिवाजी जगताप, महादेव मिसाळ, विठ्ठल महाडिक, सुखदेव निकम, सचिन हेगडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे सर यांनी केले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
Next articleअमितभाई, तुम्हीच आम्हाला वाचवा… भाजपवासीय साखर सम्राट नेत्यांची केविलवाणी अवस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here